शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

तीन प्रकल्पांमुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथचा प्रवास वेगवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते विकासाचे तीन मोठे प्रकल्प सुरू असून, या प्रकल्पातील अडचणी दूर केल्याने ...

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते विकासाचे तीन मोठे प्रकल्प सुरू असून, या प्रकल्पातील अडचणी दूर केल्याने या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना मंगळवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिल्या. या प्रकल्पांमुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगरचा प्रवास गतिमान होणार असल्याचा दावा खासदार शिंदे यांनी केला.

एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी कल्याण फाटा येथील कल्याण फाटा ते महापे हा उड्डाणपूल तीनऐवजी चार लेनचा करण्यात यावा, अशी सूचना खासदार शिंदे यांनी केली. ऐरोली काटई मार्गातल्या दुसऱ्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. ऐरोली बाजूस असलेल्या मार्गात विजेचा ट्रान्समिशन टॉवर आहे. हा टॉवर अन्य जागी हलविण्यासाठी वनविभागाने मंजुरी दिली आहे.

एलिव्हेटेड प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. या नवीन मार्गामुळे शिळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असून, ऐरोली ते काटई हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होईल. ऐरोली ते मुंब्रा जंक्शनपर्यंतचा टप्पा पुढील वर्षात वापरासाठी खुला होईल, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

कल्याण फाटा व शिळफाटा येथे अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी कल्याण शिळफाटा येथे उड्डाणपूल व कल्याणफाटा येथे अंडरपास आणि ओव्हरब्रिजचे काम ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू करण्यात येईल. कल्याण फाटा येथे ग्रेड सप्रेशनप्रणालीद्वारे मुंब्रा बायपास येथून येणारी वाहतूक अंडरपासद्वारे तळोजा-पनवेल मार्गाकडे जाण्यास मदत होईल. डोंबिवली-नवी मुंबई वाहतुकीसाठी कल्याण फाटा येथेच उड्डाणपुलाच्या उभारणी करण्यात येणार आहे. कल्याणफाटा येथील उड्डाणपुलासाठी शिळफाटा-महापे मार्गातल्या एमआयडीसीच्या पाइपलाइन पर्यायी जागी स्थलांतरित करणे गरजेचे होते. परंतु पाइपलाइन स्थलांतरित करणे खर्चिक असल्याने कल्याण फाटा येथील उड्डाणपुलाची अलाइन्मेंट बदलण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल महापे येथील एमआयडीसीची पाइपलाइन ओलांडून महापे-शिळफाटा मार्गावरच उतरवण्यात येईल. चार लेनकरिता अतिरिक्त निधी देण्याची तयारी एमएमआरडीएने दाखवली. चौथ्या लेनच्या वाढीव जमीन अधिग्रहणाबाबत ठाणे महापालिकेच्या आयुक्तांसोबत लवकरच एक बैठक घेण्यात येईल, असे खासदार शिंदे यांनी सांगितले. पत्रीपूल आणि दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडी पुलाच्या उभारणीनंतर निळजे येथील उड्डाणपुलाचे कामसुद्धा प्रगतिपथावर आहे.

----------------------

वाचली