शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाला प्रवेश न मिळाल्याने अनेक शिवसैनिकांचा हिरमोड

By जितेंद्र कालेकर | Updated: February 6, 2020 22:13 IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून देण्यात आलेले ओळखपत्र नसणाऱ्या शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी पोलिसांकडून प्रवेश नाकारण्यात आल्याने अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळाशासकीय ओळखपत्राअभावी प्रवेश नाकारले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी झाला. या कार्यक्रमासाठी शासकीय ओळखपत्राअभावी प्रवेश न मिळाल्याने अनेक पदाधिकारी तसेच शिवसैनिकांचा हिरमोड झाला.मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे हे प्रथमच ठाण्यातील विविध नागरी कामांच्या उद्घाटनासाठी गुरुवारी ठाण्यात आले होते. तीनहातनाका येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचेही लोकार्पण दुपारी त्यांच्या हस्ते झाले. सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम नियोजित असल्यामुळे सकाळी १० वाजल्यापासूनच या कार्यक्रमासाठी अनेक शिवसैनिक, पदाधिकारी याठिकाणी दाखल झाले होते. एरव्ही, पक्षप्रमुख ठाकरे यांच्या कार्यक्रमाला कोणत्याही शासकीय ओळखपत्राची गरज नसायची. त्यामुळे आताही शिवसैनिक या नात्याने प्रवेश मिळेल, या अपेक्षेपोटी अनेक शिवसैनिक तसेच नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले होते. प्रत्यक्षात, महापालिकेने या कार्यक्रमासाठी पोलिसांच्या मार्फतीने बनविलेली ओळखपत्रेच अनेकांकडे नसल्यामुळे अनेक पदाधिकाºयांना स्मारकाच्या प्रवेशद्वारावरच तासभर उभे राहावे लागले. यामध्ये वागळे विभागाचे ज्येष्ठ पदाधिकारी नारायण तांबे यांच्यासह अनेकांचा समावेश होता. काही शिवसैनिकांनी तसेच महापौर नरेश म्हस्के यांनी धावपळ करून प्रवेशद्वारावर स्वत: उभे राहून अनेकांना प्रवेश देण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांना हा प्रवेश देण्यात आला. मुंब्रा येथील राष्टÑवादीचे नगरसेवक राजन किणे हेही आपल्या काही कार्यकर्त्यांसह याठिकाणी प्रवेश करीत असताना त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने तेही या कार्यकर्त्यांसमवेत बाहेर पडले. पक्षप्रमुख ठाकरे हे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर असल्यामुळे आपल्याला सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रोटोकॉल पाळावाच लागेल, अशी समजूत काही शिवसैनिकांनी एकमेकांची काढली. तर, काहींनी मात्र उघड नाराजी व्यक्त करून प्रवेशद्वारातूनच हा कार्यक्रम पाहणे पसंत केले.* रायफली बेवारसमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यासाठी तयारी करण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक असलेल्या रायफली काही काळ उघड्यावर ठेवल्याचेही समोर आले. अलीकडेच कापूरबावडी पोलीस ठाण्यातील एका अधिकाºयाची रिव्हॉल्व्हर चोरीस गेली होती. या पार्श्वभूमीवर या रायफली उघड्यावर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. पोलिसांचा हा निष्काळजीपणा कोणाच्याही जीवावर बेतू शकतो, असेही यावेळी बोलले जात होते.* अर्ध्या तासाच्या कार्यक्रमासाठी सात तासांचा बंदोबस्तमुख्यमंत्री ठाकरे ठाण्यात विविध कार्यक्रमांसाठी दाखल होणार असल्यामुळे ठाणे पोलिसांसाठी सकाळी ६ पासूनच बंदोबस्त लावण्यात आला होता. ११.३० च्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात दुपारी १ वाजता मुख्यमंत्री दाखल झाले. पुढे अर्ध्या तासाने ते निघून गेले. पण, तब्बल सात तासांचा बंदोबस्त लावल्याने अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना ताटकळत उभे राहावे लागल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणPoliceपोलिस