लग्नाची ओली हळद सुकण्याआधीच आठव्या दिवशी नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:46 IST2017-09-05T02:46:49+5:302017-09-05T02:46:59+5:30

लग्नाची ओली हळद सुकण्याआधीच आठव्या दिवशी नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मुंब्य्रात घडली. यामुळे येथील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

Due to the drying of the wedding hale, on the eighth day, the death of a newly-married woman in a horrific accident | लग्नाची ओली हळद सुकण्याआधीच आठव्या दिवशी नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

लग्नाची ओली हळद सुकण्याआधीच आठव्या दिवशी नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

मुंब्रा : लग्नाची ओली हळद सुकण्याआधीच आठव्या दिवशी नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मुंब्य्रात घडली. यामुळे येथील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. येथील शंकर मंदिर परिसरातील वारसी टॉवरमध्ये राहणाºया तौफिक शेख याचा २७ आॅगस्टला निसबा हिच्याशी विवाह (निकाह) झाला. त्यांच्या लग्नानंतर आलेल्या बकरी ईदच्या दुसºया दिवशी (बासी ईद) ३ सप्टेंबरला रात्री ते दोघे दुचाकीवरून मुंब्रा स्थानका समोरील पुलावरून ठाण्याच्या दिशेला चालले होते. त्या वेळी त्यांच्या मागून आलेल्या वेगवान कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते दोघेही उडाले अन् उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीवरून खाली राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पडले. यात ते गंभीर जखमी झाले.

Web Title: Due to the drying of the wedding hale, on the eighth day, the death of a newly-married woman in a horrific accident

टॅग्स :Accidentअपघात