शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

बनावट प्रमाणपत्राद्वारे औषध विक्रीचा व्यवसाय: आणखी सहा फार्मासिस्ट अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:21 IST

ठाण्याच्या ढोकाळी येथील डॉ. पुरुषोत्तम ताहिलरामानी यांच्या मदतीने बनावट प्रमाणपत्र मिळवून विविध राज्यांमध्ये मेडीकल व्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने भंडाफोड केला आहे. या प्रकरणात पूर्वी सहा जणांना अटक झाली होती. आता आणखी सहा जणांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देआरोपींची संख्या १२ च्या घरातठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईआरोपींना मिळाली पोलीस कोठडी

ठाणे: बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे मेडीकल व्यवसाय थाटणा-या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अलिकडेच पर्दाफाश केला. या प्रकरणातील नरेंद्र गेहलोत (३२), हरिशंकर जोशी(३८), दीपक विश्वकर्मा (३०), प्रेमचंद चौधरी (४०), प्रवीण गड्डा (५०) आणि महेंद्र भानुशाली (३०) या आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता १२ झाली आहे.ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे मेडीकल व्यवसाय चालविण्याच्या रॅकेटमधील सहा जणांना अटक केली होती. या सहा जणांना न्यायालयीन कोठडी मिळालेली असल्याने त्यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर ठाणे शहर औषध विक्रेता संघाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह युनिट एकच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले होते. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने सखोल तपास केला. फार्मास्युटिकलसह दहावी आणि बारावीची बनावट प्रमाणपत्रेही या टोळीकडून हस्तगत करण्यात आली आहेत. ठाण्याच्या ढोकाळी येथील डॉ. पुरुषोत्तम ताहिलरामानी यांच्या मदतीने आरोपी बनावट प्रमाणपत्रे मिळवायचे. विविध राज्यांमध्ये मेडीकल व्यवसाय चालविण्यासाठी टोळीकडून या बनावट प्रमाणपत्रांचा वापर करण्यात येत होता. गुन्हे अन्वेषण विभागाकडे आलेल्या एका तक्रारीच्या आधारे याआधी सहा जणांना अटक केल्यानंतर आता अटक केलेल्या नरेंद्र गेहलोत यांचे नवी मुंबईतील दीघा येथे श्रीरामदेव मेडिकल, तर हरिशंकर जोशी यांचे मुंब्रा येथे ‘लाइफकेअर फार्मा’ मेडीकल स्टोअर आहे. दीपक विश्वकर्मा याचे मुलुंडमध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र आहे. प्रेमचंद चौधरी यांचे भिवंडी, तर प्रवीण गड्डा याचे ठाण्यात रावमराठा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स असून भानुशाली याचे डोंबिवली पूर्व भागात मेडीकल सुरु होते. गेहलोत याच्यासह सहाही जणांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMedicalवैद्यकीय