शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोविडचा दुसरा डोस घेतलेल्या वाहनचालकाचा भिवंडीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 05:47 IST

Corona Vaccination: आरोग्य विभागात  खळबळ; घटनेची चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी 

- नितीन पंडित 
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून देशभर नागरिकांना कोरोनापासून बचाव करणाऱ्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र, लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या इसमास चक्कर आल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना भिवंडीतील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रात मंगळवारी घडली. 


    मृत्यूचे नेमके कारण अजूनही समजले नसल्याने आरोग्य विभागातदेखील खळबळ उडाली आहे.सुखदेव किर्दत (वय ४५), असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून, ते भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून काम करत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता ते कोविड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील भाग्यनगर येथील कोविड लसीकरण केंद्रात गेले असता दुसरा डोस घेतल्यानंतर ते प्रतीक्षागृहात थांबले होते. त्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडल्याने त्यांना उपचारासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. किर्दत हे सकाळी ११ वाजता लसीकरण केंद्रात आले. त्यांचा रुग्ण इतिहास व इतर वैद्यकीय बाबींची चौकशी व तपासणी केली असता सर्व व्यवस्थित होते. त्यानंतरच त्यांना लसीकरणाचा दुसरा डोस दिला.  मात्र, प्रतीक्षागृहात किर्दत बसले असता त्यांना चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले, अशी माहिती लसीकरण लसीकरण केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिली.  या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी मयत सुखदेव किर्दत यांची पत्नी सोनाली किर्दत यांनी केली आहे. 

लस घेतल्यानंतर किर्दत यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर माहिती मिळेल, त्यासाठी ठाणे आरोग्य विभागाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकदेखील भिवंडीत दाखल झाले आहे. शवविच्छदन अहवालानंतरच नेमके कारण समजेल.
-डॉ. के.आर. खरात, 
मुख्य वैद्यकीय अधिकारी, भिवंडी मनपा

दुसरा डोस घेणार असल्याची माहिती सकाळी मला माझ्या पतीने दिली होती. नेहमीप्रमाणे आज ते कामावरदेखील गेले. मात्र, दुपारी मला त्यांचा अपघात झाला असल्याचा फोन आल्याने मी आयजीएम रुग्णालयात आले असता त्यांच्या निधनाची बातमी समजली. या घटनेने मला धक्का बसला असून, या घटनेची सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा
सोनाली किर्दत, मयत सुखदेव किर्दत यांची पत्नी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस