उड्डाणपूलावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे ठाण्यात वाहतूक पोलिसाला चालकाची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 21:06 IST2021-02-18T21:00:48+5:302021-02-18T21:06:24+5:30
ठाण्यातून नाशिककडे जाणाऱ्या उड्डाणपूलावर एक ट्रक बंद पडला होता. यातूनच वाहतूक कोंडी झाल्यामुळे सुनिल गणपते या कापूरबावडी उपविभागाच वाहतूक पोलिसाला एका मोटारकार चालकाने मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी गणपते यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातून नाशिककडे जाणाऱ्या उड्डाणपूलावर एक ट्रक बंद पडला होता. यातूनच वाहतूक कोंडी झाल्यामुळे सुनिल गणपते या कापूरबावडी उपविभागाच वाहतूक पोलिसाला एका मोटारकार चालकाने मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडबंदर ते नाशिककडे जाणाºया उड्डाणपूलावर १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक ट्रक बंद पडला होता. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळाल्यामुळे कापूरबावडी वाहतूक उपविभागाचे पोलीस हवालदार गणपते यांनी एका क्रेनच्या मदतीने हा ट्रक बाजूला केला. त्यानंतर त्यांनी दुसºया बाजूने येऊन ही वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घोडबंदर ते मुंबईच्या दिशेने जाणाºया एका मोटारकार चालकाने गणपते यांना शिवीगाळी आणि अरेरावी करीत त्यांच्याकडील काठीने त्यांनाच मारहाण केली. या घटनेनंतर या कारचालकाने तिथून पलायन केले. याप्रकरणी गणपते यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.