शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मंदीचा फटका विकासकांना, ५० टक्के गृहविक्री घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 00:10 IST

गुढीपाडव्याच्या तुलनेत यंदा घरांच्या किमती कमी होऊनही बुकिंगमध्ये घसरण झाली आहे.

ठाणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे ३०० घरांची बुकिंग झाली होती. त्यानंतर आता वर्ष संपत आले असताना मंदीच्या झळा थोड्या फार प्रमाणात का होईना विकासकांसोबत ग्राहकांनाही बसल्या आहेत. गुढीपाडव्याच्या तुलनेत यंदा घरांच्या किमती कमी होऊनही बुकिंगमध्ये घसरण झाली आहे. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी केवळ २०० च्या आसपास बुकिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेतही फ्लॅटच्या विक्रीत जवळ जवळ ५० टक्के घट झाली आहे.दसºयाच्या मुहूर्तावर बिल्डराकंडून आकर्षक घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच दरामध्येही बºयापैकी कपात केली. याशिवाय रजिस्ट्रेशन, जीएसटी आदी रक्कमेवरसुद्धा सुट दिली होती. त्यात ठाण्यातील वातावरण चांगले असून सांस्कृतिक शहर म्हणूनही या शहराची ओळख आहे. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत ठाण्यात अधिक पंसती मिळत असल्याची माहिती एमसीएचआयच्या एका सदस्याने दिली. त्यामुळेच ठाण्यात गृह खरेदीचा ट्रेंड मागील काही वर्षांत वाढला होता. परंतु, यंदा मंदीचा फटका विकासकांनाही बसला आहे. सुरुवातीलाच फ्लॅटच्या किमंती पाच ते दहा लाखापर्यंत कमी केल्या होत्या. परंतु, यंदा दसºयाच्या दिवशीदेखील मंदीमुळे ग्राहकांचा उत्साह फारच कमी दिसून आल्याचे एमसीएचआयच्या सदस्यांनी सांगितले. ग्राहकांचे हित जपून विविध योजना विकासकांकडून पुढे आणल्या होत्या. परंतु, तरीदेखील ग्राहकांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी दसºयाच्या मुहूर्तावर नवीन लॉचिंगही होत असते. परंतु, मंदीमुळे तशा प्रकारचे कुठेच लॉचिंगही करण्यात आलेले नाही.किमती घसरल्याने तब्बल सव्वा दोन कोटींच्या वाहनांची विक्रीएकीकडे मंदीचा बाऊ केला जात असताना दुसरीकडे वाहनांच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याने ते करण्यासाठी ठाणेकरांची झुंबड झाल्याचे पाहण्यास मिळाले. दसºयाच्या पूर्वसंध्येला जवळपास बाराशे तर दसºयाला अडीचशे गाड्यांची खरेदी झाली असून यामध्ये एक हजार दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या वाढत्या वाहनांमुळे शहरात वाहतूककोंडी भर पडणार हे मात्र आता निश्चित झाले आहे. यावेळी तब्बल दोन कोटी २० लाख रुपयांची वाहनविक्री झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सोने असो घर किंवा वाहन हे खरेदी केले जाते. त्यातच दसºयाच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांनी धाव घेतल्याचे पाहण्यास मिळाले आहे. पूर्वसंध्येला एक हजार १६० वाहनांची खरेदी झाली. यामध्ये ८५४ दुचाकी, ३२ थ्री-व्हीलर आणि ३८४ वाहने चारचाकी आणि इतर प्रकारची आहे.या वाहनांची किंमत १ कोटी ९७ लाख ५८ हजार ७६२ इतकी आहे. यामध्ये ८ लाख ८५ हजार १७२ रोखीने तर १ कोटी ८६ लाख ३९ हजार ३२३ आॅनलाइन तसेच २ लाख ३४ हजार २६७ इतर पद्धतीने व्यवहार झाला आहे. दसºयाच्या दिवशी २३२ वाहने खरेदी केली गेली असून त्याची किंमत २३ लाख २५ हजार ६६५ इतकी असून हा व्यवहार आॅनलाइन पद्धतीने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Homeघर