शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

'शहरातील खड्ड्यांचा त्रास मलाही झाला'; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली उघड नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 17:35 IST

ठाण्यात खड्ड्यांवर राजकीय वादंग सुरू असून विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट केले आहे.

ठाणे: ठाण्यात ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असून हे खड्डे त्वरीत भरावे असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाण्याला येताना रस्त्यावर खड्डे असल्याचे लक्षात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिले. खड्ड्यांकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्नी उद्धव ठाकरे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका करत असलेल्या कोरोना उपाय योजनांचा आढावा ठाणे पालिका मुख्यालयाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि तीनही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ठाण्यात खड्ड्यांवर राजकीय वादंग सुरू असून विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट केले आहे. प्रशासनामुळे सत्ताधारी बदनाम होत असल्याचा आरोप देखील यापूर्वी महापौर नरेश म्हस्के यांनी केला होता. आता यानंतर पालिका त्यामुळे मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:च ठाण्यातील खड्ड्यांच्या संदर्भात प्रशासनाला धारेवर धरून विरोधकांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे. सर्वात आधी त्यांनी ठाणो महापालिकेचा आढावा सर्व पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडून माहिती घेतली तसेच इतर अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. ठाण्याच्या पारिस्थितीवर त्यांनी समाधान व्यक्त केले असून निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.    

दरम्यान, शहरातील खड्ड्यांचा त्रास आपल्यालाही झाला असून, त्याबाबत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. खड्डे तत्काळ बुजविले जावेत, आणि नागरीकांची खड्ड्यातून मुक्तता करावी असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला नगरविकास मंत्री तथा पालकमंत्नी एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, सर्व मनपा आयुक्त, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक उपस्थित होते .

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूक