शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते..., सुरेश भट यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला गझल कार्यक्रम 

By अनिकेत घमंडी | Updated: April 15, 2024 12:43 IST

Dombivali News: इतकेच मला जाताना सरणावर कळले होते.... जगण्याने छळले होते या सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला  डोंबिवली येथे 'गझलभान' हा सुंदर गझल मैफलीचा कार्यक्रम झाला. गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून हा कार्यक्रम सादर झाला.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - इतकेच मला जाताना सरणावर कळले होते.... जगण्याने छळले होते या सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला  डोंबिवली येथे 'गझलभान' हा सुंदर गझल मैफलीचा कार्यक्रम झाला. गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून हा कार्यक्रम सादर झाला. चंद्रशेखर सानेकर यांच्या  कविता, गझल यांच्या संयुक्त सूत्रसंचालनाने कार्यक्रम शानदार झाला. 

सारंग पंपटवार, स्वप्नील शेवडे, रत्नमाला शिंदे,कैलास गांधी आणि डोंबिवलीतील चित्रकार-गझलकार गोविंद नाईक यांच्या सहभागाने कार्यक्रम खरच खूप बहारदार झाला. गझल ही तशी आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट! पण गझल मैफिलीत बसल्यावर गझलेच्या एका एका शेरावर जेव्हा वाह..क्या बात! मुकर्रर!!बहोत अच्छे!वाह..!!अशी रसिकांची प्रतिक्रिया ऐकतो तेव्हा आपणही त्यात कधी सामील होऊन जातो कळतच नाही. रदिफ,काफिया, अलामत, वृत्त, मतला,शेर,मुरद्दफ,गैरमुरद्दफ अशा अनेक तांत्रिक गोष्टींतून गझलेत जेव्हा गझलीयत आलेली असते तेव्हा ती गझल ऐकणाऱ्या प्रत्येकाची झालेली असते. हे गझल मैफलीत गेल्यावरच कळते.

त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे गझल लिहीताना खूप तांत्रिक गोष्टी शिकाव्या लागतात. सहज ती प्राप्त होत नाही. गझल लिहीणारा खूप अनुभवी कवी असायला हवा किंवा जीवनाचा मोठा अनुभव गाठीशी असायला हवा अशी माझी समजूत होती पण या कार्यक्रमात सारंग,स्वप्नील,रत्नमाला या खूपच तरूण मुलांनी गझला सादर केल्या ते पाहून माझा समज गळून पडला. गझल आता तरूण कवींची आवड बनली आहे हे पाहून भट साहेबांनी लावलेले छोटेसे झाड आता  वृक्ष बनत चालले आहे हे मात्र नक्की झाले आहे. 

असे कार्यक्रम वरचेवर व्हायला हवेत आणि मोठमोठ्या गझलकारां सोबत तरूण गझलकारांनाही स्टेज शेअर करण्याची संधी मिळायला हवी.त्यामुळे भविष्यात मराठी साहित्य क्षेत्रात अनेक कवी-गझलकार नावा रूपाला येतील.

टॅग्स :dombivaliडोंबिवली