उल्हासनगरात शिवसेनेकडून जोडो मारो आंदोलन

By सदानंद नाईक | Updated: June 3, 2023 19:38 IST2023-06-03T19:38:32+5:302023-06-03T19:38:45+5:30

उल्हासनगर शिवसेना शिंदे गट व युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार संजय राऊत यांनीं केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

Dodo Maro movement by Shiv Sena in Ulhasnagar | उल्हासनगरात शिवसेनेकडून जोडो मारो आंदोलन

उल्हासनगरात शिवसेनेकडून जोडो मारो आंदोलन

उल्हासनगर: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबत केलेल्या कृत्याचा शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध करून, छत्रपती शिवाजी महाराज चौकात राऊत यांच्या पोस्टर्सला जोडो मारो आंदोलन करण्यात आले आहे. 

उल्हासनगर शिवसेना शिंदे गट व युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार संजय राऊत यांनीं केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांच्या फोटो पोस्टर्सला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांनी संजय राऊत यांच्या कृतीचा निषेध व्यक्त करून यानंतर असा प्रकार झाल्यास त्यांच्या घरा समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. आंदोलनात नाना बागुल, माजी नगरसेवक अंकुश म्हस्के, कुलवंतसिंग, युवासेनेचे विकी भुल्लर, युवराज पाटील, विकी बागुल, सुरजित पंजाबी आदीसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: Dodo Maro movement by Shiv Sena in Ulhasnagar