शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

दूध दरवाढीचा तूर्त ग्राहकांवर बोजा नाही!

By admin | Updated: June 20, 2017 06:31 IST

दुधाचे दर तीन रुपयांनी वाढवण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असली, तरी या दरवाढीपेक्षा दुप्पट रक्कम ग्राहक आधीच मोजत असल्याने शासनाने शेतकऱ्यांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दुधाचे दर तीन रुपयांनी वाढवण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असली, तरी या दरवाढीपेक्षा दुप्पट रक्कम ग्राहक आधीच मोजत असल्याने शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या दरवाढीचा फटका सध्या तरी ग्राहकांना बसणार नाही. परंतु, जादा नफा कमवून गल्ला भरणाऱ्या दूध संकलक कंपन्या काही दिवसांतच ही दरवाढ लादण्याचा प्रयत्न करतील, अशी भीती दूधविक्रेते व्यक्त करत आहेत.सोमवारी गायीचे दूध २४ वरून २७ रुपये, तर म्हशीचे दूध ३३ वरून ३६ रुपये दराने विकण्यास राज्य शासनाने कंपन्यांना व दूध फेडरेशनला परवानगी दिली. हा वाढीव दर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु, या कंपन्या किंवा दूध फेडरेशनकडून गायीचे दूध ४० ते ४३ रुपये दराने, तर म्हशीचे दूध ५० ते ५४ रुपये लीटरने ग्राहक आधीच घेत आहेत. यामुळे वाढीव किमतीचा फटका सध्या ग्राहकांना बसणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कंपन्या काही दिवसांनी ग्राहकांना वाढीव दराचा फटका देणार असल्याची भीती ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संघटनेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.मुंबई, ठाणे ते पनवेलपर्यंत सुमारे ५५ लाख लीटर दुधाची विक्री रोज होते. ठाणे शहरात सुमारे साडेतीन लाख लीटर दूध विकले जाते. कल्याण, डोंबिवली परिसरांत सुमारे चार लाख लीटर दुधाची विक्री होते. शेतकऱ्यांकडून २४ रुपये लीटरने घेतलेले गायीचे दूध ग्राहकाला ४३ रुपये भावाने विकले जात आहे. म्हणजे, लीटरमागे १६ रुपयांची लूट कंपन्यांकडून आधीच होत आहे. म्हशीचे दूध नव्या वाढीव दरानुसार ३६ रुपये लीटर मिळणार आहे. पण, ग्राहक या दुधासाठी आधीच १८ रुपये जादा देत आहे. ग्राहक आधीच जादा भाव देत असल्यामुळे सध्या त्यांना या वाढीव दराचा फटका बसू दिला जाणार नाही, असा अंदाज आहे.