विभक्त राहणाऱ्या बापाने मुलाला दिले सिगरेटचे चटके, भिवंडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 19:56 IST2022-07-26T19:56:33+5:302022-07-26T19:56:58+5:30
मुलाच्या आईने पतीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विभक्त राहणाऱ्या बापाने मुलाला दिले सिगरेटचे चटके, भिवंडीतील घटना
भिवंडी :दि.२६-
कौटुंबिक वाद वाढल्याने वेगवेगळ्या राहणाऱ्या पतिपत्नीचा मुलगा पत्नीकडे राहत असताना काही दिवसांसाठी मुलास आपल्या घरी घेऊन गेलेल्या पतीने मुलाच्या अंगावर सिगारेटचे चटके देऊन जखमी केल्याची खळबळजनक घटना शांतीनगर परिसरात सोमवारी घडली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने पतीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फहीम रिजवान अहमद खान व सनानुर आलम शेख हे दोघे नात्याने पतिपत्नी असून त्यांच्यात वाद वाढल्याने ते विभक्त होऊन राहत होते.त्यांना हसन नावाचा एक मुलगा असून तो आई सनानुरकडे राहत आहे.दरम्यान पती रिजवानने काही दिवसांसाठी मुलास आपल्या कडे राहण्यास घेऊन आला होता. २० जुलै ते २५ जुलै दरम्यान मुलगा पुन्हा आईकडे माघारी जाऊ नये यासाठी मुलाच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मुलाच्या हातावर व अंगावर सिगरेटचे चटके देऊन त्यास जखमी केले.या बाबत मुलाची आई सनानुर आलम शेख हिने पती फहीम रिजवान अहमद खान विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मुलाला जाणीव पूर्वक दुखापत करून जखमी केल्या प्रकरणी मुलाच्या बापा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.