शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

जिल्ह्याला मिळाल्या ३९,३०० कोविशिल्ड लसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 11:25 AM

ठाण्यासह जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटपुंजा पुरवठा होत आहे. त्यामुळेच अर्ध्याहून अधिक केंद्रे रोजच्या रोज बंद आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.

ठाणे : एकीकडे लसीकरणाचा तुटवडा जाणवत असल्याने शासनाने तूर्तास १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाला ब्रेक दिला आहे. त्यानुसार ठाण्यातही बुधवारी या वयोगटाचे लसीकरण बंद होते. त्यात आता जिल्ह्याला बुधवारी कोविशिल्डचा ३९ हजार ३०० लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. ४५ वयोगटापुढील नागरिकांचा पहिला आणि दुसरा डोस यातून दिला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात ४५ वयोगटापुढीलच लसीकरण मोहीम सुरू होती.ठाण्यासह जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटपुंजा पुरवठा होत आहे. त्यामुळेच अर्ध्याहून अधिक केंद्रे रोजच्या रोज बंद आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. ठाण्यातला हा सावळा गोंधळ दूर करण्यासाठी महापालिकेने टोकन पद्धत बंद केली आहे. तसेच रोजच्या रोज कोणत्या केंद्रात किती लसी उपलब्ध आहेत, याची माहिती आदल्या दिवशी दिली जात आहे. त्यानुसार लसीकरणाच्या दिवशी ऑफलाइन रांगा लावून नागरिकांना लस घ्याव्या लागत आहेत. परंतु, त्यातही एखाद्या केंद्रावर ९० लसी असतील तर रांगेतील केवळ ९० नागरिकांनाच टोकन दिले जात आहे. उर्वरितांना घरी जाण्यास सांगितले जात आहे. तरीदेखील नागरिक पहाटे ५  पासूनच रांगेत उभे राहत आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या तुटपुंज्या साठ्यानंतर आता जिल्ह्याला पुन्हा ३९ हजार ३०० कोविशिल्ड लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. तो किती दिवस पुरविला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानुसार प्रत्येक महापालिकेला ५०० ते ५ हजारपर्यंतचा साठा मिळाला आहे.

शहरनिहाय मिळालेली कोविशिल्डची लस ठाणे ग्रामीण      ९,२००कल्याण-डोंबिवली      ६,३००उल्हासनगर      १,२००भिवंडी      २,०००ठाणे महापालिका      ७,०००मीरा-भाईंदर      ६,६००नवी मुंबई      ७,०००एकूण      ३९,३०० 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस