पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 03:00 PM2020-10-02T15:00:54+5:302020-10-02T15:03:21+5:30

Palghar district शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दि.1 ऑक्टोबर पासून दि.14 ऑक्टोबर 2020 पर्यंत आदेश लागू

District Collector issues restraining order in Palghar district! | पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी !

पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी !

Next

वसई - पालघर जिल्ह्यात कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव आहे. तसेच राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलने व रस्ता रोको करण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी,पालघर डॉ.किरण महाजन, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधिक्षक पालघर यांचे  कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.1 ते दि.14 ऑक्टोबर 2020 या कालीवधीमध्ये मनाई आदेश लागु केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.


दरम्यान शनिवारी लागू केलेल्या या मनाई आदेशात खालील बाबी नमूद केल्या आहेत, यामध्ये शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या अथवा‍ शारिरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.


किंवा  कोणतीही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. तसेच दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. किंवा व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सोबत सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे यांस प्रतिबंध आहे. तर ज्यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहाचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे हावभव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकात प्रचार करणे यांस बंदी आहे.


तसेच याखेरीज हा आदेश प्रेतयात्रांना लागु असणार नाही. तसेच हा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरीष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागु असणार नाही.

Web Title: District Collector issues restraining order in Palghar district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर