गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप 

By सुरेश लोखंडे | Updated: March 19, 2024 19:23 IST2024-03-19T19:23:49+5:302024-03-19T19:23:59+5:30

भिवंडी जवळील गणेशपुरीमध्ये गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे मोफत वाटप प्रसाद चिकित्सा संस्थेकडून आज करण्यात आले आहे.

Distribution of free bicycles to needy students | गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप 

गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप 

ठाणे: भिवंडी जवळील गणेशपुरीमध्ये गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे मोफत वाटप प्रसाद चिकित्सा संस्थेकडून आज करण्यात आले आहे. त्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भिवंडी तालुक्यातील तानसा खोऱ्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना या सायकली चे वाटप करण्यात आले. यातानसा खोऱ्यातील अति दुर्गम भागातून मुलांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती,त्यामुळे त्यांना घरातून लवकर जावे लागत असत. पण आता या सायकलींच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांना वेळेत व नियमित शाळेत जाणे शक्य होणार आहे.

या विद्यार्थ्यांची ही गरज प्रसाद चिकित्सा संस्थेसह रोटरी क्लब मुंबई कांदिवली वेस्ट यांनी हेरून या विद्यार्थ्यांना या सायकलींचे संयुक्त विद्यमाने वाटप करण्यात आले आहे. 'आम्हाला आज खूप भारी वाटतंय आमच्या सायकली खूप छान आहेत. शाळा दूर असली तरीही आता चिंता नाही' असे मुलांकडून ऐकायला मिळत आहे. चेहऱ्यावरील आनंद वेगळाच होता.या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब मुंबई कांदिवली वेस्ट व प्रसाद चिकीत्सा संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.या संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Distribution of free bicycles to needy students

टॅग्स :thaneठाणे