लॉकडाऊनमध्ये शिवसेना नगरसेवकाकडून दारूच्या बाटल्यांचं वाटप; म्हणाला, करायला गेलो एक, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 01:51 PM2021-05-25T13:51:25+5:302021-05-25T13:59:49+5:30

देशात कोरोनामुळे विदारक परिस्थिती उद्भवली असून लॉकडाऊन असल्याने लोकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे, अनेक सामाजिक संघटना, विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे.

Distribution of liquor bottles by Shiv Sena corporator in lockdown in thane; niranjan davkhare tweet photo | लॉकडाऊनमध्ये शिवसेना नगरसेवकाकडून दारूच्या बाटल्यांचं वाटप; म्हणाला, करायला गेलो एक, पण...

लॉकडाऊनमध्ये शिवसेना नगरसेवकाकडून दारूच्या बाटल्यांचं वाटप; म्हणाला, करायला गेलो एक, पण...

Next
ठळक मुद्देदेशात कोरोनामुळे विदारक परिस्थिती उद्भवली असून लॉकडाऊन असल्याने लोकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे, अनेक सामाजिक संघटना, विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे.

मुंबई - कोरोना लॉकडाऊनमध्ये गोरगरीब आणि गरजूंना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जातोय. मात्र, शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चक्क दारुचा खंबा वाटप कार्यक्रम केलाय. या खंबा वाटप कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अनेकांनी नगरसेवकाची खिल्ली उडवली असून असा नगरसेवक आपल्या मतदारसंघात असावा, अशीही उपहासात्मक इच्छा व्यक्त केलीय. अनेकांनी थेट टीका करुन परिस्थितीचं गांभीर्य नसल्याचंही म्हटलंय. 

देशात कोरोनामुळे विदारक परिस्थिती उद्भवली असून लॉकडाऊन असल्याने लोकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे, अनेक सामाजिक संघटना, विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे. असे असताना ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चक्क मद्य वाटप केल्याने सोशल मीडियासह सर्वच स्तरातून मोठी टीका होत आहे. आमदार निरंजन डावखरे यांनीही ट्विटरवरुन या उपक्रमावर टीका केलीय. 

 
शिवसेना आमदाराच्या कार्यालयात मद्यवाटप म्हणजे आनंद दिघेसाहेबांच्या विचारांना तिलांजली, असे ट्विट निरंजन डावखरे यांनी केलंय. 

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे परिसरातील दिपक वेतकर या नगरसेवकाने शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयातच हा दारू वाटपाचा कार्यक्रम केला. याच परिसरात राहणारे समाजसेवक प्रकाश सुर्वे यांनी याबाबत थेट ठाणे मनपा आयुक्त, ठाणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली असून या नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने करीत आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाने प्रशासनाच्या कामावर पाणी फिरवण्याचं काम केलंय. त्यामुळे, या नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय. 

हे गेल्या वर्षीचे फोटो आहेत. 
सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो हे मागच्या वर्षीचे आहेत. आपण विडंबन करायला गेलो, मात्र विटंबना झाली. आता एक वर्षानंतर हे प्रकरण पुढे आणून माझी बदनामी केली जात आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक दीपक वेतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. 
 

Web Title: Distribution of liquor bottles by Shiv Sena corporator in lockdown in thane; niranjan davkhare tweet photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.