शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

स्वच्छ ठाण्यासाठी सल्लागारावर पावणेचार कोटींची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 1:45 AM

घनकचरा व्यवस्थापन विभाग करतो काय : महापालिकेच्या कारभाराचा केला ‘कचरा’

ठाणे : स्वच्छ भारत अभियानाच्या स्पर्धेत ठाणे महापालिकेचा क्रमांक दरवर्षी घसरत असताना आता हा क्रमांक सुधारण्याच्या नावाखाली सल्लागार नेमण्याचा घाट घातला जात आहे. त्यानुसार शहरात निर्माण होणारा कचरा, त्याची विल्हेवाट लावणे, उपाययोजना, वाहतूक, कचरा प्रक्रियाच्या विविध पद्धती आदींसह इतर उपाय करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. याचाच अर्थ पालिका कचऱ्याची समस्या सोडविण्यात कमी पडत असल्यानेच आता ती सोडविण्यासाठी खाजगी संस्थेचा घाट घालण्याचे काम सुरूझाले असून दोन वर्षांसाठी ३ कोटी ६३ लाख ८० हजार ४०० रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे.

महापालिकेने यंदा पुन्हा स्वच्छ भारत अभियनाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मात्र, मागील काही वर्षांत पालिकेचा क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत घसरला आहे. स्वच्छतेमध्ये क्रमांक यावा यासाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा चुराडा केला जात आहे. असे असताना आता पुन्हा कचºयाची समस्या सोडविण्यासाठी पालिका कमी पडत असल्याने ती सोडविण्यासाठी खाजगी सल्लागार समितीची नेमणूक केली जाणार आहे. महापालिका हद्दीत १ हजार मेट्रिक टन कचºयाची निर्मिती होत आहे. त्यानुसार कचºयाचे संकलन, साठवणूक, वाहतूक व शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे ही कामे पालिकेकडून सुरू आहेत. तसेच शहरात निर्माण होणारा बांधकाम तोडफोड तरतुदीनुसार विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. शहराची साफसफाई व रिफ्युज कॉम्पॅक्टरची व्यवस्था केलेली आहे. दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या, डोंगरउतरावरील वस्त्या ज्या ठिकाणी कोणतेही वाहन पोहचू शकत नाही अशा ठिकाणी सामाजिक संस्था, बचत गटाची नियुक्ती करुन त्यांच्यामार्फत घरोघरी कचरा संकलन करण्याची कार्यवाही सुरूआहे. त्यानुसार शहरातील ६०० मेट्रिक टन कचºयाची बंद कंटेनरमधून वाहतूक करण्यात येत आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यामध्ये विकेद्रींत पद्धतीने ५-५ टन क्षमतेचे बायोमिथेन गॅस, मॅकेनिकल कंपोस्टिंग व बायोकंपोस्टिंग या तंत्रज्ञानावर आधारीत रोज १०० टन कचºयाची विल्हेवाट वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे काम सुरूआहे.

डम्पिंगपासून कचरा वर्गीकरणात महापालिका नापासडायघर येथे पहिल्या टप्यात ६०० मेट्रिक टन व दुसºया टप्यात ६०० मेट्रिक टन असे एकूण १२०० टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून हे केंद्रीत पद्धतीने काम केले जाणार आहे. बांधकाम तोडफोड कचरा १०० मेट्रिक टन तयार होत असून त्यावर सुद्धा प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे.

त्यानुसार आता स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेची अंमलबजावणी ही चार टप्प्यात करण्यात येत असून एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर आणि १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत घेण्यात येत आहे. परंतु,पालिकेने पुन्हा एकदा विविध प्रकल्पांचे अवलोकन केले असले तरी अद्यापही महापालिकेला स्वत:चे हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळू शकलेले नाही.शिवाय ओला आणि सुक्या कचºयाची समस्या सुटू शकलेली नाही, शास्त्रोक्तपद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावण्यात पालिका आजही अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे पालिकेचा क्रमांक दरवर्षी या स्पर्धेत घसरतांना दिसत आहे. असे असतांना आता स्वच्छतेचा क्रमांक सुधारण्यासाठी पालिकेने या कामासाठी सल्लागार समिती नेमण्याचा घाट घातला असून या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी होणाºया महासभेत पटलावर ठेवला आहे. दोन वर्षांच्या कामासाठी तब्बल ३ कोटी ६३ लाख ८० हजार ४०० रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाला टाळे लावामहापालिकेकडे स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन विभाग असून या विभागात शेकडो अधिकारी-कर्मचाऱ्यांसह हजारो सफाईकामगार आहेत. दरवर्षी या विभागावर कोट्यवधींचा खर्च होता. शेकडो कोटींची मशिनरी या विभागासाठी तैनात असते. मग या विभागाचे अधिकारी-कर्मचारी स्वच्छतेसाठी झटण्याऐवजी नुसत्या खुर्च्या उबवतात काय असा संतप्त सवाल आता ठाणेकर करू लागले आहेत. सल्लागार नेमून त्यावर पावणेचार कोटींची उधळण करायचीच असेल तर या पुरता कचरा झालेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला आयुक्तांनी कायमचे टाळे लावावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका