भिवंडीत मृत अवस्थेतील स्त्री-जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ
By नितीन पंडित | Updated: December 28, 2022 18:17 IST2022-12-28T18:16:36+5:302022-12-28T18:17:07+5:30
भिवंडीत मृत अवस्थेतील स्त्री-जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे.

भिवंडीत मृत अवस्थेतील स्त्री-जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ
भिवंडी : शहरानजीक असलेल्या खोणी गावाजवळील एका बंद पडलेल्या कारखान्याच्या भिंतीलगत असणाऱ्या झाडाझुडपात मंगळवारी अर्धवट वाढ झालेले मृत अवस्थेतील नवजात स्त्री-जातीचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
या घटनेची नोंद निजामपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून हे मुल जन्माला आल्याने मातृत्व लपवण्यासाठी अथवा स्त्री जातीचे असल्याने अर्भक फेकले असावे असा कयास लावला जात आहे. सदरची खळबळ जनक घटना निदर्शनास येताच खोणी गावचे पोलीस पाटील दिलीप बाळाराम पाटील यांनी निजामपूरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.