ठाणे महानगरपालिकेच्या रेकॉर्डरुममधून नस्ती झाल्या गायब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:44 IST2017-10-04T17:43:42+5:302017-10-04T17:44:01+5:30

ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाईल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु आता रेकॉर्ड रुम मधील नस्तीच गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.

The disappearance of the Thane corporation's record-room disappeared | ठाणे महानगरपालिकेच्या रेकॉर्डरुममधून नस्ती झाल्या गायब 

ठाणे महानगरपालिकेच्या रेकॉर्डरुममधून नस्ती झाल्या गायब 

ठाणे  - ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाईल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु आता रेकॉर्ड रुम मधील नस्तीच गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात भाजपाचे ठाणो विभागीय उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून या बाबत सखोल चौकशी करुन ज्यांनी नस्ती गायब केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    महापालिका क्षेत्रतील अंतिम भुखंड क्र. 208/4 विकास प्रस्तावाच्या भुखंडाच्या असलेल्या सर्व नस्त्या गहाळ झाल्याची चर्चा व काही तक्रारी घाडीगांवकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसा त्यांनी स्वत: या संदर्भात पालिकेच्या संबधींत विभागाशी संपर्क साधून या नस्तींची माहिती मागविली होती. परंतु संबधींत विभागात ती नस्ती आढळूनच आली नाही. विशेष म्हणजे रेकॉर्ड रुम मधून देखील नस्ती गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. संबधींत विभागाच्या अधिका:यांकडे चर्चा केली असता, त्यांनी शहर विकास विभागात ती नस्ती असेल असे उडवा उडवीचे उत्तर दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोण दोषी आहे, नस्ती कुठे गायब झाली. याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी घाडीगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शिवाय अशा प्रकारे रेकॉर्डरुम मधून कोण कोणत्या नस्त्या गायब झाल्या, विकास प्रस्तावाच्या कोणकोणत्या नस्ती कोणकोणत्या अधिका:याकडे कामाव्यतिरिक्त पडून आहेत, रेकॉर्ड रुम मध्ये न ठेवता नस्ती बाहेर ठेवण्याच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी कठोर आदेश पारीत करावेत अशीही मागणी त्यांनी पत्रद्वारे केली आहे.

Web Title: The disappearance of the Thane corporation's record-room disappeared