मोबाइल हिसकावून पळणारे दोघे ठाण्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:35 IST2018-08-23T20:30:49+5:302018-08-23T20:35:09+5:30

एलबीएस मार्गावरून २२ आॅगस्ट रोजी रात्री पायी जाणाऱ्या संजय विश्वकर्मा यांचा मोबाइल हिसकावून पळालेल्या अनर सिद्दीकी आणि सरफराज खान या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच मोबाईलसह अटक केली.

Dio mobiles snatcher arrested in Thane | मोबाइल हिसकावून पळणारे दोघे ठाण्यात जेरबंद

वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

ठळक मुद्दे एलबीएस मार्गावरील घटना अवघ्या काही तासांतच लावला छडा वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

ठाणे : वागळे इस्टेट, एलबीएस मार्गावरून बुधवारी रात्री पायी जाणा-या संजय विश्वकर्मा (२९, रा. सिद्धेश्वर तलाव, नौपाडा, ठाणे) यांचा मोबाइल हिसकावून पळ काढणा-या अनर सिद्दीकी (२०) आणि सरफराज खान (२०) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. दोघांनाही एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
रहेजा गार्डन सोसायटी, गेट क्रमांक-१ बसस्टॉपजवळील रस्त्यावरून विश्वकर्मा हे २२ आॅगस्ट रोजी रात्री १०.३० च्या सुमारास पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या तिघांपैकी एकाने त्यांना धक्का मारला, तर दुसºयाने त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाइल हिसकावून पलायन केले. याप्रकरणी त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण आणि सीताराम वाघ यांच्या पथकाने वागळे इस्टेट, हाजुरी दर्गा भागातील सिद्दीकी आणि खान या दोघांना २३ आॅगस्ट रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जेरबंद केले. त्यांच्याकडून मोबाइलही हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Dio mobiles snatcher arrested in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.