शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ठाण्यात चोरट्यांची कमाल, जप्तीच्या दारुची केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:52 PM

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाण्याच्या कोपरी येथील कार्यालयातील गोदामातून जप्त केलेल्या मद्याचे २७ हजार ३६० रुपयांचे तीन बॉक्स दिवसाढवळ्या चोरणा-या दोघांना कोपरी पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे उत्पादन शुल्क कार्यालयाची सुरक्षा ऐरणीवर दोघे अटकेत कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे चोरटे गजाआड

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरी येथील कार्यालयातील गोदामातून जप्त केलेल्या मद्याचे २७ हजार ३६० रुपयांचे तीन बॉक्स अगदी दिवसाढवळ्या चोरणा-या मुस्तफा अब्दुल कयुम शेख (१८) आणि अशरद हजरत अली शेख (२८) या दोघांना कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे कोपरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील ऐवज हस्तगत केला असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.विशेष म्हणजे याच उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून पाच दिवसांपूर्वी जीप चोरीस गेली होती. याप्रकरणी तिघांना निलंबितही करण्यात आले आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतर पुन्हा याठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने या कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाच्या आवारातील गोदामात धाडीत जप्त केलेला मद्यसाठा ठेवला जातो. १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हे दोघेजण कार्यालयाच्या आवारात शिरल्यानंतर गोदामाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. त्यांनी गोदामातील मद्यसाठ्यातील तीन बॉक्स चोरले. चोरटे दारूचे बॉक्स घेऊन बाहेर पडत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चालक विशाल सुतार आणि शिपाई अविनाश जाधव यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. दोघांच्या चौकशीतून गोणीतून त्यांनी दारूचे तीन बॉक्स आणल्याचे आढळले. या दोघांना कोपरी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी