मद्यपी चालकाचा वाहतूक पोलीस कार्यालयात धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:30 AM2021-02-19T04:30:52+5:302021-02-19T04:30:52+5:30

------------------------------------------------------ रिक्षा चोरीला कल्याण : रिक्षाचालक रवींद्र बुकाने यांनी त्यांची रिक्षा ते राहत असलेल्या खडकपाडा येथील शंखेश्वर कृपा कोकण ...

Dhingana at the traffic police office | मद्यपी चालकाचा वाहतूक पोलीस कार्यालयात धिंगाणा

मद्यपी चालकाचा वाहतूक पोलीस कार्यालयात धिंगाणा

Next

------------------------------------------------------

रिक्षा चोरीला

कल्याण : रिक्षाचालक रवींद्र बुकाने यांनी त्यांची रिक्षा ते राहत असलेल्या खडकपाडा येथील शंखेश्वर कृपा कोकण रत्न हॉटेलमागे अश्विनी बिल्डिंगसमोरील रोडवर रविवारी रात्री उभी केली होती. ती चोरीला गेली असून, या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

-----------------------------------------

संगणक चोरी

कल्याण : येथील पूर्वेकडील नेतीवली परिसरातील वसाहतीत राहणारे इरफान शेख यांच्या बंद घराला असलेले कुलूप तोडून चोरट्यांनी संगणक चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------------

दुचाकी चोरी

डोंबिवली : ईश्वर लोटन पाटील यांनी त्यांची दुचाकी फडके रोडवर सोमवारी सकाळी ७ वाजता उभी केली होती. ती चोरीला गेली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------------------------------

Web Title: Dhingana at the traffic police office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.