शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या; रोशनी शिंदे मारहाणीवरून उद्धव ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 14:59 IST

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ठाणे-

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जनतेशी प्रामाणिक राहून गृहमंत्री फडणवीस यांनी तातडीनं राजीनामा द्यायला हवा. महिलांचा सन्मान हे काही नुसतं बोलून होत नाही. उगाच फुकाच्या यात्रा काढू नका. तुमच्यात जर आरोपींवर कारवाई करण्याची हिंमत नसेल तर राजीनामा द्या, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यातील रुग्णालयात दाखल असलेल्या रोशनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. रोशनी ठाकरे यांची विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरे थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे गेले. पण आयुक्तालयात पोलीस आयुक्तच उपस्थित नव्हते. त्यामुळे भेट होऊ शकली नाही. उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या विश्रामगृहात या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 

गुंडांचं ठाणे बनत चाललंय"महिलांचा सन्मान करणारं ठाणे, दिघे साहेबांचं ठाणे, सुशिक्षित लोकांचं ठाणे अशी ठाण्याची ओळख होती. ती आता गुंडांचं ठाणे अशी ओळख होऊ लागली आहे. ठाण्यात आता महिला गुंडांचीही गँग तयार होऊ लागलीय. एक गोष्ट मिंधे गटानं लक्षात घ्यावी की आम्ही आमच्यावरील संस्कारांमुळे शांत आहोत. पण जर ठरवलं तर एका क्षणात ठाणेच काय तर महाराष्ट्रातील गुंडगिरी उपटून काढू शकतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

फडणवीसांना पदावर राहण्याचा अधिकार नाहीउद्धव ठाकरे यांनी रोशनी शिंदे हल्ला प्रकरणी अद्याप साधा एफआयआर देखील नोंदवून घेण्यात आलेला नसल्याचं म्हणत सरकारवर हल्लाबोल केला. "सुरक्षित महाराष्ट्र आणि महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र म्हणून तुम्ही मिरवता. पण इथं एका महिलेला मारहाण होती आणि अजूनही तिचा एफआयआर नोंदवून घेण्यात आलेला नाही. एका महिलेल्या पोटात लाथा मारण्यात आल्या. त्या मातृत्वासाठीचे उपचार घेत होत्या. याची कल्पना देऊनही महिला गुंडांनी त्यांना पोटात लाथा मारल्या. हे अतिशय निघृण काम आहे. अजूनही तुम्ही जर लाचारपणाच दाखवणार असाल तर गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. महिलांचा सन्मान करता येत नसेल तर उगाच सावरकर गौरव यात्रा वगैरे फुकाच्या यात्रा काढू नका. आधी राजीनामा द्या", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस