शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीपाड्यात राहून विकसित केली ‘अ‍ॅण्टी पोल्युशन सिस्टीम’, भारत सरकारने दिले पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:46 IST

भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने या पेटंटला प्रमाणित केले असून त्यांचा हा प्रकल्प भारतासाठीच नव्हे तर जगासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

ठाणे : वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरण आणि भूसृष्टीला मारक ठरू लागला आहे. यामुळे मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. ठाण्यातील आदिवासीपाड्यात राहणाऱ्या एका अभियंत्याने मात्र या प्रदूषणाला आळा घालणारी यंत्रणा विकसित करून ठाण्याचे नाव जागतिक पातळीवर नेण्याचे काम केले आहे. भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने या पेटंटला प्रमाणित केले असून त्यांचा हा प्रकल्प भारतासाठीच नव्हे तर जगासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.ठाण्यातील घोडबंदर रोड, गायमुख, कशेळी गावात राहणारे महेंद्र लोणारे यांनी 'अ‍ॅण्टी पोल्युशन सिस्टीम आॅन दी रोड' ही यंत्रणा विकसित केली आहे. रस्त्यांवरून धावणाºया गाड्यांमधून जो घातक घटक धुरामधून बाहेर पडतो, त्या धुराला ही यंत्रणा नष्ट करणार आहे. मेकॅनिकल इंजिनीअर असणारे महेंद्र यांचे गेल्या अनेक वर्षांपासून ‘अ‍ॅण्टी पोल्युशन सिस्टीम आॅन दी रोड‘ या प्रकल्पावर संशोधन सुरू होते. जिथे वाहनांची वर्दळ अधिक आहे, अशा ठिकाणी किंवा वाहने धावणाºया रस्त्यांवर ही यंत्रणा बसविल्यास तेथे चालू गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर शोषला जाऊन त्यातील विषारी घटक नष्ट केले जाणार आहेत.९० टक्के कार्बनडायआॅक्साइडहोणार नष्टशहरातील मोठे सिग्नल, चौक किंवा जिथे वाहनांची जास्त वाहतूक आहे, अशा ठिकाणी अथवा रस्त्यांच्या दुभाजकांच्या जागेत हा प्रोजेक्ट राबविता येतो. १०-१२ फूट उंच कारंजासारखे पाण्याचे फवारे उडवून त्याठिकाणी गाड्यांमधून निघणाºया धुरातील विषारी घटक शोषले जाऊन एका टाकीत जमा होणार आहेत. धुरातील वायूचे विषारी कण पाण्यात मिसळून पाणी रिसायकल होणार आहे.हा प्रकल्प ज्या ठिकाणी लावला जाईल, तेथील ९० टक्के कार्बनडायआॅक्साइड आणि इतर विषारी पदार्थ या ठिकाणी नष्ट करता येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकल्पाचे भारत सरकारकडून त्यांना पेटंट मिळाले असून अगदी कमी खर्चात हे प्रकल्प ठिकठिकाणी उभे केले जाऊ शकतात.>गाड्यांमधून निघणारा धूर ही जागतिक समस्या बनली आहे. भारतासारख्या देशाला ही समस्या जास्तच भेडसावणारी आहे. गाड्यांचा वापर अनिवार्य झाला असल्याने त्यांच्यातून निघणाºया विषारी घटकांचा प्रदूषणावर वाईट परिणाम होत आहे. गाड्यांची वाहतूक थांबविता येऊ शकत नाही, पण त्यामधून तयार होणारे प्रदूषण कमी करता येईल का, यावर विचार करत होतो. त्यातूनच ही यंत्रणा उभी केली. अगदी कमी खर्चात ही यंत्रणा उभी करता येऊ शकते. पाण्याच्या कारंजामधून ती कार्यान्वित होत असून, तो परिसरही सुशोभित दिसतो.- महेंद्र लोणारे