घरफोड्या करणारी सराईत टोळी अटकेत; २४ घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 14:38 IST2018-07-09T14:37:30+5:302018-07-09T14:38:21+5:30
राजा जुल्फिकार इंद्रिशसह इतर आरोपी जेरबंद

घरफोड्या करणारी सराईत टोळी अटकेत; २४ घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल
उल्हासनगर - अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरातील दिवसा घरफोड्या करणारी सराईत टोळीला उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे जवळजवळ २४ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.आरोपी राजा जुल्फिकार इंद्रिश हा या टोळीचा म्होरक्या असून अन्य आरोपींना बेड्या टोकण्यात आल्या असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखा घटक - ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या आरोपींनी मुंबईत काळाचौकी व अन्य परिसरात देखील घरफोड्या केल्या आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हि टोळी दिवसाढवळ्या सँट्रो कारमधून येऊन घरफोड्या करत असे असे तरडे यांनी सांगितले. घरफोड्या करण्यात सराईत टोळी हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सध्या या आरोपींकडून जवळपास १५ लाखांचे दागदागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.