शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

जीवनवाहिनी सुरु होऊनही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, बरे होणाऱ्यांचे प्रमाण तीन हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 01:11 IST

CoronaVirus News In Thane : सध्या उपनगरीय वाहतूक सर्वांसाठी खुली केली आ-हे. या दरम्यान सर्वसामान्य प्रवाशांना वेळेचे बंधन आहे. त्या कालावधीसह अन्यही वेळेत सेकंड क्लासच्या डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.

 - सुरेश लोखंडे

ठाणे : सर्वांसाठी उपनगरीय वाहतूक सुरू होऊन तब्बल बारा दिवस झाले. या दरम्यान कोरोनारुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या बारा दिवसांच्या कालावधीत रुग्णसंख्येचा चढ-उतार लक्षात घेऊन कमीत कमी २५ ते ५० रुग्णांची या कालावधीत वाढ झाली तर मृतांचे प्रमाण अत्यल्प आढळले. या कालावधीत बरे होणाऱ्यांचे प्रमाण मात्र तीन हजारांपेक्षा जास्त आढळले आहे.सध्या उपनगरीय वाहतूक सर्वांसाठी खुली केली आ-हे. या दरम्यान सर्वसामान्य प्रवाशांना वेळेचे बंधन आहे. त्या कालावधीसह अन्यही वेळेत सेकंड क्लासच्या डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा कधीच उडालेला पाहायला मिळत आहे. तरीदेखील रुग्णसंख्येचा दैनंदिन अहवाल लक्षात घेता बारा दिवसांच्या कालावधीत जास्तीत जास्त ५० रुग्णांची भर पडलेली दिसून येत आहे. यात सुरुवातीचे तीन दिवस २१५ ते २१६ या रुग्णसंख्येत अवघ्या एका रुग्णाची वाढ झालेली दिसून आली. तर त्यानंतरचे दोन दिवस ४० रुग्णांची वाढ आढळली. या लोकल प्रवासाच्या दरम्यान दोन दिवस ३०८ ते ३६४ रुग्णसंख्या दिसत असली तरी त्यात २५ ते ३० रुग्णांची वाढ झालेली होती. या चढ-उतार रुग्णसंख्येचा आलेख लक्षात घेता रुग्णसंख्येचे प्रमाण फारसे वाढले नसल्याचे उघड झाले आहे.रुग्णसंख्येच्या या अल्प वाढीच्या आलेखाप्रमाणेच मृतांच्या आकडेवारीतही फारशी वाढ झालेली नाही. या कालावधीत सुरुवातीला एक ते दोन मृतांची वाढ होताना दिसून आली. ती आजपर्यंतही कमी प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनारुग्ण मृतांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनात आले आहे. याशिवाय बारा दिवसांत बऱ्या होणाऱ्यांची संख्या तीन हजार २२नी वाढली आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये दररोज २०० ते ३०० जणांची वाढ होताना दिसून आली.सध्याच्या लोकल प्रवासादरम्यान मास्कची सक्ती केली जात असल्यामुळे तिचे पालन बऱ्यापैकी आहे. तर शहरांमध्येही मास्क वापरण्याची शिस्त असली तरी बहुधा ते दाढीला अडकलेले जास्त दिसून येतात. या बेशिस्तांवरील कारवाई सध्या मंदावली आहे. त्यामुळे शहरातील मास्क वापरण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नागरिक नियम बिनधास्त मोडत आहेत.

सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झालेली आहे. सध्या थंडीचा कालावधी असल्यामुळे सर्दी, पडशाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये सर्दी, पडसे वाढले आहे. वातावरणातील बदलामुळे हे रुग्ण वाढले आहेत. त्यास फारसे गांभीर्याने घेण्यासारखे वाटत नाही.- डॉ. संतोष कदम, अध्यक्ष आयएमए, ठाणे

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस