शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

‘बीएस ४’ वाहननोंदणीतून ठाणे आरटीओच्या तिजोरीत सव्वा कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 6:19 AM

नंदकिशोर नाईक यांची माहिती : एक हजार ५६१ वाहनांची झाली नोंदणी

ठाणे : बीएस ४ मानक असलेल्या एक हजार ५६१ वाहनांची नोंदणी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. यामुळे ठाणे आरटीओच्या तिजोरीत एक कोटी २२ लाखांहून अधिक रुपयांचा महसूल जमा झाला असून तो अवघ्या दोन दिवसांतील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशात वाहन प्रदूषणाची मात्रा कमी व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार १ एप्रिलपासून नवीन वाहनांची नोंदणी करताना,ते बीएस ६ मानक या इंजिनचेच असावे असे म्हटले होते. त्यामुळे ३१ मार्च रोजी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात बीएस ४ इंजिन असलेल्या अखेरच्या ८०३ वाहनांची नोंदणी झाली होती. याचदरम्यान सुप्रीम कोर्टाने बीएस ४ या वाहनांची नोंदणी करण्यासाठी २९ ते ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदत वाढवून दिली होती. या नोंदणीपोटी आरटीओत एक कोटी २२ लाख ५२ हजार ३७१ रुपये इतका महसूल जमा झाल्याची माहिती ठाणे आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.शेवटच्या दोन दिवसांत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात १२८० दुचाकी,  ८२ मोटार,  ३१ बस,  ७१ तीनचाकी प्रवासी वाहने आणि इतर सर्व मिळून एक हजार ५६१ वाहनांची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस