मुंबई, ठाण्यातून हद्दपार ‘टिल्ल्या’ कळव्यात पकडला

By जितेंद्र कालेकर | Updated: April 4, 2024 20:18 IST2024-04-04T20:18:41+5:302024-04-04T20:18:59+5:30

कळवा पाेलिसांची कारवाई: तीन महिन्यांपूवीर् केले हाेते हद्दपार

Deported from Mumbai, Thane, 'Tillaya' caught in Kalva | मुंबई, ठाण्यातून हद्दपार ‘टिल्ल्या’ कळव्यात पकडला

मुंबई, ठाण्यातून हद्दपार ‘टिल्ल्या’ कळव्यात पकडला

ठाणे: मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या अजित ऊर्फ टिल्या मारूती सुडके ( ३२, रा.गोपाळराव नगर, कळवा पूर्व, ठाणे) याला माेकाट फिरताना कळवा पाेलिसांनी पुन्हा अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पाेलिसांनी गुरुवारी दिली.

अजित सुडके याच्याविरुद्ध हाणामारीसह अनेक गंभीर स्वरुपाचे गु्न्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी परिमंडळ एकचे पाेलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी त्याला ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पालघर आणि रायगड या पाच जिल्हयांमधून दाेन वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश १९ जानेवारी २०२४ राेजी दिले हाेते.

या मनाई आदेशाचा भंग करुन अजित हा विनापरवानगी कळवा परिसरात माेकाट फिरत असल्याची माहिती कळवा पाेलिसांना मिळाली हाेती. त्याच आधारे ३ एप्रिल २०२४ राेजी दुपारी ४.२० वाजता कळव्यातील गोपाळरावनगर भागातून गस्तीवरील पाेलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पाेलिस हवालदार पी.एम.जाधव हे करीत आहेत.

Web Title: Deported from Mumbai, Thane, 'Tillaya' caught in Kalva