मुरबाड : परतीचा पाऊस हा आरोग्याला हानिकारक ठरला असून मुरबाड तालुक्यात मौजे नारिवली येथे २० ते २५ जणांना डेंग्यूची बाधा झाली आहे. मुरबाडमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गणपती हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालय तसेच कल्याण, मुंबईसारख्या शहरी भागातील खाजगी हॉस्पिटलमध्ये महागडे उपचार घेत आहेत. मात्र, मुरबाडमधील शासकीय आरोग्य यंत्रणा यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यास अपयशी ठरली आहे. तरीही याचे खापर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी रहिवाशांवर फोडले असून ते आरोग्याची काळजी घेत नसल्यामुळे असे किरकोळ आजार होत असल्याचे वक्तव्य केले आहे. यांमुळे नागरिकांत संताप आहे.नारिवली गावातील काही जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे डॉ. निलेश खोडदे यांनी सांगितले.
डेंग्यू हा तर किरकोळ आजार - आरोग्य विभाग
By admin | Updated: October 14, 2016 06:18 IST