नगररचनाकार मुळे यांना हटविण्याची मागणी; उल्हासनगर महापालिका आयुक्तांना तक्रारीचा हार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:32 PM2023-11-08T16:32:28+5:302023-11-08T16:33:11+5:30

उल्हासनगर महापालिका वादग्रस्त नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्र कल्याण पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष, गेल्या एका वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत.

Demand for removal of urban planner Mule; Complaint lost to Ulhasnagar Municipal Commissioner | नगररचनाकार मुळे यांना हटविण्याची मागणी; उल्हासनगर महापालिका आयुक्तांना तक्रारीचा हार

नगररचनाकार मुळे यांना हटविण्याची मागणी; उल्हासनगर महापालिका आयुक्तांना तक्रारीचा हार

- सदानंद नाईक

उल्हासनगर : महापालिका नगररचनाकार प्रकाश मुळे यांची बदली होत नसल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्ष व राष्ट्र कल्याण पार्टीच्या वतीने मंगळवारी आयुक्त अजित शेख यांना तक्रारीची हार देण्यात आला. तसेच मुळे यांची बदली न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा पक्ष पदाधिकार्यांनी दिला आहे.

 उल्हासनगर महापालिका वादग्रस्त नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्र कल्याण पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष, गेल्या एका वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र आयुक्त अजिज शेख यांनी नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. नगररचनाकार विभागात विनापरवाना बोगस कर्मचारी नियुक्ती केल्या प्रकरणी नगररचनाकार मुळे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. असे असतांना आयुक्त शेख यांनी नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही? असा प्रश्न पक्ष पदाधिकार्यांनी आयुक्तांना केला. ग्रीन झोन, डीपी रोड, शासकीय भूखंड आदी ठिकाणी बांधकाम परवाने दिल्याचे उघड झाल्याने नगररचनाकार विभाग वादात सापडला आहे. 

महापालिका आयुक्त अजीज शेख यांची प्रहार व राष्ट्र कल्याण पार्टीच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी दुपारी भेट घेऊन, आजपर्यंत केलेल्या तक्रारींचा हार त्यांनी आयुक्त अजीज शेख यांना दिली. महापालिका नगररचनाकार मुळे यांच्यावर कारवाई झाली नाहीतर, उग्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्या बदलीचा प्रस्ताव शासन दरबारी पुन्हा पाठवणार व त्यांचे अधिकार गोठवणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर, विवेक सिंह, आशिष मेहेर, प्रीतम दुसाने, गौरव पाठारे, अतुल खेडेकर, उदय शिंदे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आलम खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Demand for removal of urban planner Mule; Complaint lost to Ulhasnagar Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.