शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

पोलिसाला कोरोना झाल्याने मास्क न घालताच मॉर्निग वॉक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 08:25 IST

भाईंदर पश्चिमेला राधास्वामी सत्संग मार्गावर कांदळवनाचे दाट जंगल असून या ठिकाणी खारवी समाजाची तुरळक लोकवस्ती आहे . या मार्गावर शहरातून सकाळी आणि सायंकाळी मोठ्या संख्येने लोकं मॉर्निंग वॉक , सायकलिंग व धावण्यासाठी येतात .

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या राधास्वामी सत्संग मार्गावर सकाळी व सायंकाळी मास्क न घालताच व घोळक्याने फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांवर कारवाईची मागणी नागरिकांनी चालवली आहे . कारण रोज सकाळी मित्र मंडळी सह वॉक ला  येणारा पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्याला भाईंदरच्या जोशी रुग्णालयात दाखल केले आहे . 

भाईंदर पश्चिमेला राधास्वामी सत्संग मार्गावर कांदळवनाचे दाट जंगल असून या ठिकाणी खारवी समाजाची तुरळक लोकवस्ती आहे . या मार्गावर शहरातून सकाळी आणि सायंकाळी मोठ्या संख्येने लोकं मॉर्निंग वॉक , सायकलिंग व धावण्यासाठी येतात . यात नागरिकांसह काही नगरसेवक , पोलीस , पालिका कर्मचारी , व्यावसायिक आदी बड्या लोकांचा देखील सहभाग असतो . 

गर्दी इतकी असते की गाड्यांना तर पार्किंगला जागा नसते . एरव्ही लोकांना मास्क घाला , डिस्टंसिंग पाळा सांगणारे नगरसेवक आदी अनेक जबाबदार मंडळीच या ठिकाणी मास्क न घालताच फिरताना दिसतात . मास्क न घालताच सोशल डिस्टनसिंग चे उल्लंघन करून घोळका करत गप्पा मारतात वा चालताना लोकं दिसतात . त्यातही येथे येणारी नगरसेवक, कार्यकर्ते आदी बडी मंडळी असल्याने पालिका आणि पोलीस देखील त्यांच्यावर कारवाई करत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे . 

रोज सकाळी मित्र मंडळीसह धावण्यासाठी जाणारा  पोलीस कर्मचारी हा कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे . सदर पोलीस कर्मचारी मीरारोड पोलीस उपविभागीय कार्यालयात कार्यरत असल्याने तेथील पोलीस कर्मचारी देखील धास्तावले आहेत . 

राधास्वामी सत्संग मार्गावर मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकां मुळे गर्दी होत असून ही लोकं मास्क पण घालत नसल्याने स्थानिक रहिवासी देखील संतापले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर