आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्यापूर्वीच लोकार्पण; ठाणे महानगरपालिकेकडून विकासकामांची यादी मिळण्यासाठी लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:38 IST2025-12-09T10:38:08+5:302025-12-09T10:38:37+5:30

दोन महिन्यांपूर्वी मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. याच महिन्यात मेट्रो सुरू होणार असल्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. १५ दिवसांत घोडबंदर भागात विविध विकासकामांचे नारळ वाढविण्यात आले आहे.

Dedicating to the public before getting caught in the trap of code of conduct; Urgently waiting to get a list of development works from Thane Municipal Corporation | आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्यापूर्वीच लोकार्पण; ठाणे महानगरपालिकेकडून विकासकामांची यादी मिळण्यासाठी लगबग

आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्यापूर्वीच लोकार्पण; ठाणे महानगरपालिकेकडून विकासकामांची यादी मिळण्यासाठी लगबग

अजित मांडके

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होणार असल्यामुळे ठाणे महापालिकेत भूमिपूजन करण्यायोग्य व लोकार्पण करण्यायोग्य कामांची यादी करून लवकरच याचा धूमधडाका लावण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रभाग समिती अधिकाऱ्यांना फोन करून या सोहळ्यांच्या याद्या झटपट सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दोन महिन्यांपूर्वी मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. याच महिन्यात मेट्रो सुरू होणार असल्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. १५ दिवसांत घोडबंदर भागात विविध विकासकामांचे नारळ वाढविण्यात आले आहे.

पुढील ८ ते १५ दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने अनेक माजी नगरसेवकांची ठाणे पालिकेत धावाधाव सुरू आहे. प्रभागातील गटार, पायवाटा, रस्त्यांसह इतर कामांच्या निविदा मंजूर करून त्यांच्या भूमिपूजनासाठी धांदल सुरू आहे. भूमिपूजन केव्हा करता येऊ शकते, लोकार्पण केव्हा येऊ शकते, याच्या तारखा मागवल्या आहेत. नेत्यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण करण्यासाठी त्यांच्या तारखा मिळविण्याचा प्रयत्न माजी नगरसेवकांकडून सुरू आहे.

भूमिपूजन करण्यासाठी शिवशिवताहेत हात

सत्ताधाऱ्यांकडून कोणकोणती

कामे अंतिम झाली, कोणती कामे पूर्ण झाली याची माहिती घेऊन एकत्रित

कार्यक्रम आखण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून आता त्या - त्या विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून कामांची यादी मागवली जात आहे.

सत्ताधाऱ्यांकडून भूमिपूजन लोकार्पणासाठी धावपळ सुरू असताना ठेकेदार आचारसंहितेच्या आधी बिले काढून मिळावीत, निविदा अंतिम

करून त्या प्रसिद्ध केल्या जाव्यात, यासाठी पालिका मुख्यालयात खेटे मारत आहेत. आचारसंहिता लागली तर पुन्हा दोन महिने कामासाठी थांबावे लागेल म्हणून ही धावपळ सुरू आहे.

Web Title : आचार संहिता से पहले परियोजनाओं का लोकार्पण करने में ठाणे महानगरपालिका

Web Summary : चुनाव नजदीक आते ही, ठाणे महानगरपालिका परियोजनाओं का लोकार्पण तेज़ी से कर रही है। अधिकारियों ने उद्घाटन समारोहों के लिए पूर्ण और निकट-पूर्ण कार्यों की सूचियाँ मांगी हैं। ठेकेदार चुनाव आचार संहिता लागू होने से पहले बिलों की मंजूरी के लिए दौड़ रहे हैं।

Web Title : Thane Municipal Corporation rushes to launch projects before code of conduct.

Web Summary : With elections nearing, Thane Municipal Corporation expedites project launches. Officials seek lists of completed and near-completion works for inauguration ceremonies. Contractors rush for bill clearances before the election code of conduct takes effect.