CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट; ४४५ नवे रुग्ण, तर १४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 08:38 PM2020-12-18T20:38:56+5:302020-12-18T20:45:41+5:30

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत १०९ बाधितांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

Decrease in the number of corona patients in Thane district; 445 new patients and 14 deaths | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट; ४४५ नवे रुग्ण, तर १४ जणांचा मृत्यू

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट; ४४५ नवे रुग्ण, तर १४ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देकल्याण डोंबिवलीत ११७ रुग्णांसह २ जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये ३८ रुग्णांची नोंद झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. परंतु शुक्रवारी जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. ठाणे जिल्ह्यात ४४५ रुग्णांची तर १४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या २ लाख ३८ हजार १०५ तर, मृतांची संख्या आता ५ हजार ८६३ झाली आहे. 

ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत १०९ बाधितांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ९२९ तर, १२८३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १०८ रुग्णांची तर, २ जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

कल्याण डोंबिवलीत ११७ रुग्णांसह २ जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. भिवंडी महापालिका क्षेत्रात ९ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. 

उल्हासनगरमध्ये ६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अंबरनाथमध्येही ९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये २२ रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात २७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ५६६ झाली आहे. तर मृतांचा आकडा ५७५ झाला आहे.
 

Web Title: Decrease in the number of corona patients in Thane district; 445 new patients and 14 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.