शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

पीपीई संदर्भातील केंद्राचा निर्णय डॉक्टरांच्या जीवावर उठणारा, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 3:41 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार चुकीची भुमिका घेत असल्याची टिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर ज्या अधिकाºयाने काही लोकांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली. त्याला आता सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे : केंद्र सरकारने पीपीई किट आणि मास्क आमच्या परवानगीशिवाय घेऊ नका, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याबाबत महाराष्ट्राच्या भाजपने पत्रकार परिषद घेऊन हे सर्क्यूलर रद्द करण्याची मागणी करावी, वाधवान संदर्भात संबधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले असताना त्याचे राजकारण करु नये, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र भाजपला फटकारले आहे.             पीपीई किट खरेदी करण्यास केंद्र सरकारने महाराष्ट्राला मनाई केली आहे. त्याबाबत भाष्य न करणाºया भाजपने भलत्याच मुद्यावर राजकारण सुरु केले असल्याची टिकाही त्यांनी केली. कुठला तरी अधिकारी कोणाला तरी पत्र देतो आणि ती माणसे महाबळेश्वरला जातात. त्यामध्ये कोणाचा काही सबंध नाही. त्या अधिकाºयाने ते मनाने केलेले आहे. पण, या सर्वांचा रोख शरद पवारांकडे वळविला जात आहे. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय आपले दुकान चालणारच नाही, हे भाजपच्या नेतृत्वाला माहित आहे. यामध्ये पवारांचा काय सबंध? गेले ५० वर्षे भाजपवाले हेच करीत आहेत. कौतूक या गोष्टीचे करा की हे पत्र बाहेर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांकडे गेले, मुख्यमंत्र्यांकडे गेले, तत्काळ या दोघांनी चर्चा करु न रात्री बारा वाजता संबधित अधिकारी झोपेत असताना त्या अधिकाºयाला सक्तीच्या रजेवर पाठवले. हे इतके सक्षम शासन आहे आणि ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे. आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, पण, आमचे भिष्माचार्य शरद पवार आहेत. असले फालतू लाड आम्ही करीत नाही. आता दुसरी गोष्ट अशी की, केंद्राचे एक पत्र आले आहे की, आमच्या परवानगी शिवाय तुम्ही पीपीई किट घ्यायचे नाही, मास्क घ्यायचे नाहीत, कोणतेही वैद्यकीय साहित्य घ्यायचे नाही. लोकं मरताहेत, पीपीई किट नाही म्हणून लोकं ओरडताहेत, आम्ही अजूनपर्यंत तोंड बंद ठेवलेले होते. आम्हला राजकारण करायचे करायचे नव्हते. पण, आता तुम्ही बोला की केंद्राने हे का केले. महाराष्ट्राच्या बद्दल काही कुटील हेतू आहे का त्यांच्या मनात? तेव्हा ताबडतोब हे सर्क्यूलर मागे घ्या, अशी मागणी करण्यासाठी भाजपवाले पत्रकार परिषद घेतील का? आमचे साहित्य आम्हाला आणू द्या, आमच्या डॉक्टरांची- चतुर्थश्रेणी कामगारांची आम्हाला काळजी आहे. आम्ही त्यांना ते देऊ द्या; महाराष्ट्राचा सगळा खिजना आम्ही कोरोनाच्या निर्मूलनासाठी वापरु आणि लोकांचे जीव वाचवू. पण, केंद्राने अशी आडकाठी आणून महाराष्ट्राला अडचणीत आणले आहे. हे नको तिथे, नको ते सबंध जोडून राजकारण करु नका, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड