शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मृत नगरसेवकाच्या फेसबुक खात्यावरून सत्ताधारी लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:38 IST

उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याची चौकशीनंतर सुटका; मारहाण केल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भाजपचे दिवंगत नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने फेसबुक अकाउंटवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला. अन्य एका प्रकरणात बनावट अकाउंट तयार करून त्यावरूनही बदनामीकारक मजकूर पोस्ट केला जात आहे. याप्रकरणी संशयित म्हणून आपल्याच कार्यकर्त्याला नाहक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी सोमवारी केला. त्याला ताब्यात घेतल्यानंतरही फेक आयडीवरून ‘टायगर अभी जिंदा हैं,’ अशी पोस्ट रविवारी केल्याकडे सरैय्या यांनी लक्ष वेधले. यातील संशयिताला चौकशीनंतर सोडले असून, कोणालाही मारहाण केली नसल्याचा दावा श्रीनगर पोलिसांनी केला.

विलास कांबळे यांच्या नावाशी मिळतेजुळते असलेले एक अकाउंट अनोळखी व्यक्तीने तयार केले. तसेच सुशील सिंग यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावरून बदनामीकारक संदेश प्रसारित केले. कांबळे यांच्या नावाचे बनावट आयडी तयार करून त्यावरून शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांवर टीकाटिप्पणी करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. याबाबत सुशील कुमार सिंग (३६, डिलिव्हरी बॉय, विटावा, ठाणे) यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

चंद्रेशला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर काही काळानंतर सोडून दिले. त्याला मारहाण केलेली नाही. विलास कांबळे यांचे फेसबुक अकाउंट बंद केले आहे. सुशील सिंग यांचे अकाउंट हॅक केल्याचा हा वेगळा प्रकार आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी दिली.

धक्काबुकीचा आरोपया प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत श्रीनगर पोलिसांनी उद्धवसेनेच्या कथित कार्यकर्ता असलेल्या चंद्रेश यादव याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला सोडून दिले. दिवंगत नगरसेवक विलास कांबळे यांचे बंधू सुरेश कांबळे हे श्रीनगर पोलिस ठाण्यात गेले असता, पोलिस ठाण्याच्या आवारातच त्यांनाही शिंदेगटाच्या काही शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप सरैय्या आणि कांबळे यांनी केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणेFacebookफेसबुक