प्लास्टीकची पिशवी डोक्यात अडकून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 07:59 IST2023-03-20T07:59:17+5:302023-03-20T07:59:37+5:30

या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Death due to plastic bag stuck in head | प्लास्टीकची पिशवी डोक्यात अडकून मृत्यू

प्लास्टीकची पिशवी डोक्यात अडकून मृत्यू

ठाणे : प्लास्टीकची पिशवी डोक्यात अडकून अभिजीत नाईक  (१०, रा.कोपरी) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे. 
अभिजीत हा १७ मार्चला रात्री ९ वाजता आनंदनगर येथील कामगार केंद्राजवळील त्याच्या घरातील पोटमाळ्यावर एकटाच खेळत होता. त्याची आई संजोती कामावरून घरी आल्यानंतर, त्याला पाहण्यासाठी पोटमाळ्यावर गेल्या. तेव्हा  प्लास्टीकची पिशवी डोक्यात घातलेल्या अवस्थेत तो बेडवर  निपचित पडलेला आढळला. 
त्याची आई आणि मावशी यांनी त्याला खाली घेऊन डोक्यातील पिशवी काढली. त्यानंतर, त्याला तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गतिमंद असलेल्या अभिजीत याने प्लास्टीकची पिशवी डोक्यात घातल्याने त्याचा श्वास काेंडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: Death due to plastic bag stuck in head

टॅग्स :thaneठाणे