"यदा कदाचित" नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 10:58 IST2020-12-16T10:58:27+5:302020-12-16T10:58:49+5:30

''यदा कदाचित'' नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे आज निधन झाले. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

Datta Ghosalkar, the producer of the play "Yada Kadachit" has passed away | "यदा कदाचित" नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे निधन

"यदा कदाचित" नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे निधन

ठाणे : ''यदा कदाचित'' नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे आज निधन झाले. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ठाणे, महागिरी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

दत्ता घोसाळकर यांना रात्री एकच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी १२ व जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा यदा कदाचित रिटर्न हे नाटक २६ डिसेंबर पासून रंगभूमीवर येणार होते. कोरोनानंतर त्याचा पहिला प्रयोग होणार होता. तसेच त्यांचे दोन प्रोजेक्टवर काम सुरू होते.

Web Title: Datta Ghosalkar, the producer of the play "Yada Kadachit" has passed away