शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

लालचुटूक गाजरांची रोजची मागणी पाच हजार किलोंची

By admin | Published: December 11, 2015 1:18 AM

महागाईच्या वाढत्या झळांपासून त्यातल्या त्यात गारवा देणाऱ्या लालेलाल, पौष्टीक, आरोग्यदायी व स्वस्त आणि मस्त असे जोधपुरी गाजर बाजारात दाखल झाले आहेत

प्रज्ञा म्हात्रे,  ठाणेमहागाईच्या वाढत्या झळांपासून त्यातल्या त्यात गारवा देणाऱ्या लालेलाल, पौष्टीक, आरोग्यदायी व स्वस्त आणि मस्त असे जोधपुरी गाजर बाजारात दाखल झाले आहेत. मधूर असल्याने गाजर हलवा व ज्युससाठी त्यांना मागणी वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची विक्री तेजीत असून संपूर्ण ठाण्यात दररोज जवळपास पाच हजार किलो गाजरांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी लोकमतला सांगितले.गेले काही महिने इंदौर व नाशिकच्या नारिंगी रंगाच्या गाजरांनी गर्दी केली होती. या गर्दीत लालेलाल गाजर दिसणे दुर्मिळ झाले होते. परंतु, थंडीची चाहूल लागली आणि लालेलाल अशा जोधपूरी गाजरांनी बाजारात एन्ट्री केली. नोव्हेंबर ते एप्रिल हा मुख्यत्वे जोधपूरी गाजरांचा हंगाम असतो. त्यामुळे दिवाळीनंतर या गाजरांची आवक सुरू झाली असली तरी गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गाजर पाहायला मिळत आहे. होलसेल बाजारात ३० ते ३२ रुपये किलोने तर किरकोळ बाजारात ४० रुपये किलोने जोधपुरी गाजरांची विक्री होत आहे. आवक वाढल्याने केवळ बाजारपेठांमध्ये नव्हे तर हातगाड्यांवर देखील जोधपुरी गाजरांचाच रुबाब दिसतो.१गाजराचा एक ग्लास रस संपूर्ण भोजनाची ऊर्जा देणारा असतो. डोळयांसाठी फायदेशीर असणा-या गाजरामध्ये व्हिटॅमिन ए,बी,सी,डी,ई,जी ही जीवनसत्त्वे असतात.२शिवाय हिवाळ््यात गाजराचे सेवन नियमित केल्याने विशेष फायदा होतो असे डॉक्टर सांगतात. त्यामुळेच हा फायदा लक्षात घेता सध्या ठाणेकरांनी आपला मोर्चा बाजारात डेरेदाखल झालेल्या जोधपूरी गाजरांच्या खरेदीकडे वळवला आहे. ३मुख्यत्वे ठाण्यातील हॉटेल व खानावळी व्यावसायिक सलार्ड व कोशिंबीरसाठी तसेच, लोणचे उत्पादक व्यापारी ते बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाजरांची खरेदी करत असल्याने सध्या त्यांची विक्री तेजीत सुरू आहे.