शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

दबंगगिरीकडून गांधीगिरीकडे

By admin | Updated: May 16, 2017 00:14 IST

महापालिकेच्या वतीने फेरीवाले, रिक्षावाले यांच्या विरोधात गेले सात दिवस सुरू असलेल्या कारवाईबाबत सोशल मीडियात विरोधी सूरही उमटू लागल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिकेच्या वतीने फेरीवाले, रिक्षावाले यांच्या विरोधात गेले सात दिवस सुरू असलेल्या कारवाईबाबत सोशल मीडियात विरोधी सूरही उमटू लागल्याने सोमवारी कारवाईकरिता सायंकाळी रस्त्यावर उतरलेले महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चक्क नागरिकांशी संवाद साधत आपण करत असलेली कारवाई योग्य की अयोग्य, असा सवाल केला. सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ठाणे स्टेशन ते जांभळीनाका बाजारपेठ असा पाहणी दौरा आयुक्तांनी केला. या वेळी नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यांची पथकेही त्यांच्या दिमतीला होती. या वेळी रस्त्यावर एकही फेरीवाला आढळून आला नाही. नियमाचे उल्लंघन करून रिक्षा पार्क करणाऱ्या रिक्षाचालकांना आणि वाहनचालकांना आयुक्तांनी आपली वाहने हलवण्याची तसेच शिस्तीत उभी करण्याची विनंती केली. आयुक्तांच्या या विनंतीला वाहनचालकांनीदेखील तितक्याच विनम्रतेने प्रतिसाद दिला. यापूर्वी जयस्वाल यांनी रिक्षावाले, वाहनचालक यांना स्वत: चौदावे रत्न दाखवले होते. त्याबद्दल फेसबुक, टिष्ट्वटर व व्हॉट्सअ‍ॅपवर विरोधी सूर उमटल्याने आयुक्तांनी आपल्या आक्रमकतेला मुरड घातल्याचे बोलले जाते. याच विरोधातील चर्चेची दखल घेत आयुक्तांनी काही नागरिकांशी संवाद साधून त्यांना आपल्या कारवाईबद्दल काय वाटते, याचा कानोसा घेतला आणि आपली भूमिका सांगितली.