चायनीज दुकानात सिलिंडरचा स्फोट; अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 08:18 IST2018-11-29T02:54:48+5:302018-11-29T08:18:56+5:30
कल्याण पश्चिमेकडील गोल्डन पार्क परिसरात असलेल्या एका चायनीज दुकानात मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट झाला. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामन दलाच्या जवानाचा जागीच मृत्यू झाला

चायनीज दुकानात सिलिंडरचा स्फोट; अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
कल्याण : कल्याण पश्चिमेकडील गोल्डन पार्क परिसरात असलेल्या एका चायनीज दुकानात मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट झाला. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामन दलाच्या जवानाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक जण जागीच गंभीर जखमी झाला आहे.
मध्यरात्री 1.10 वाजण्याच्या सुमारास हा मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. स्फोटानंतर आग लागल्याने कल्याण महापालिकेचे अग्निशामन बंब घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते. यावेळी अग्निशमन दलाचे जवान जगन आंबवले यांचा जागीच मृत्यू तर पालवे हे गंभीर जखमी झाले आहेत.