"सध्या खादी कपडे हे युवा वर्गाचे आकर्षण"; केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचे मत
By नितीन पंडित | Updated: October 2, 2023 18:05 IST2023-10-02T18:04:30+5:302023-10-02T18:05:34+5:30
भिवंडीत केली खादी कपड्याची खरेदी

"सध्या खादी कपडे हे युवा वर्गाचे आकर्षण"; केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचे मत
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त संपूर्ण देशभरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी किमान एक जोडी खादी कपड्याची खरेदी करावी असे निर्देश भाजपाचे राष्ट्राध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिले होते.त्यानुसार केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी भिवंडी शहरातील लाहोटी कंपाऊंड या ठिकाणी खादीचे कपडे खरेदी करून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यापासून त्यांनी खादी कपड्यांना प्राधान्य दिल्यामुळे देशभरात खादी विक्रीची टक्केवारी वाढली आहे. देशभरात खादी खरेदीने खादी या ग्रामोद्योगाला चालना मिळत असून कारागिरांना रोजगार मिळत आहे. तर सध्या खादी कपडे हे युवा वर्गाचे आकर्षण ठरत आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खादी खरेदी नंतर दिली आहे.