ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार कुकरीसह जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 01:05 IST2021-11-01T00:58:16+5:302021-11-01T01:05:07+5:30
पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश असतानाही कुकरी बाळगणाऱ्या आकाश श्रवणे (२९, रा. चिरागनगर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्र वारी अटक केली.

ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश असतानाही कुकरी बाळगणाऱ्या आकाश श्रवणे (२९, रा. चिरागनगर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्र वारी अटक केली. त्याच्याकडून कुकरी जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी रविवारी दिली.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील पाहिजे तसेच फरारी आरोपींचा शोध घेऊन कारवाईचे आदेश खंडणीविरोधी पथकाला दिले होते. त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने वर्तकनगर भागातील पाइपलाइनरोड भागातून संशयास्पदरीत्या फिरताना आकाश रावणे याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक कुकरी जप्त करण्यात आली. त्याच्याविरु द्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात २९ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आला. त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.