तरुणीने बघतोस काय म्हटल्यावरून राडा

By धीरज परब | Updated: November 5, 2023 16:06 IST2023-11-05T16:05:13+5:302023-11-05T16:06:12+5:30

दोन गटात राडा होऊन दोन्ही बाजूने भाईंदर पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

crime news fighting between two groups in miraroad | तरुणीने बघतोस काय म्हटल्यावरून राडा

तरुणीने बघतोस काय म्हटल्यावरून राडा

मीरारोड - भाईंदरच्या मुर्धा रेव आगार भागात कॅरम खेळत बसलेल्या तरुणीकडे बघणाऱ्यास तिने बघतोस काय? अशी विचारणा केली असता तू काय मोठी हिरोईन लागून गेली का असे सांगत त्या तरुणाने साथीदारांसह हल्ला चढवला. त्यातूनच दोन गटात राडा होऊन दोन्ही बाजूने भाईंदर पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

रेव आगार, साईबाबा नगरमध्ये राहुल सोनी हा भाऊ अमित व शेजारी राहणारी नंदिनी जयस्वाल असे तिघे शुक्रवारी ३ च्या सुमारास घराबाहेर कॅरम खेळत होते. त्यावेळी हरीश, जैकेश, अमन तिवारी, निखिल तिवारी, विकास चौधरी, राजेश गौंड हे आले व त्यांच्याकडे बघू लागले. त्यावर नंदिनी ने बघतोस काय? अशी विचारणा केली असता हरीश याने तू काय मोठी हिरोईन लागून गेली काय बोलत त्यांच्याशी भांडण सुरु केले. त्यात जैकेश याने नंदिनीच्या डोक्यात दगड मारला. तर अन्य साथीदारांनी राहुल व भावास शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अशी फिर्याद राहुल याने दिल्याने पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

तर जैकेश निषाद याने दिलेल्या फिर्यादी वरून नंदिनी व तिचा भाऊ अतुल , राहुल आणि गोलू ह्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. जैकेशच्या फिर्यादी नुसार मित्र विकास चौधरी याला राहुल व त्याचे मित्र मारत असताना तो वाचवण्यास गेला असता नंदिनी हिने रस्त्यावरचे ब्लॅड विकासाच्या हातावर मारले. तसेच अन्य तिघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे नमूद आहे. भाईंदर पोलीस दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत आहेत. 

Web Title: crime news fighting between two groups in miraroad