Crime News: व्यापाऱ्यांची ५ लाखाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 21:25 IST2023-04-09T21:23:58+5:302023-04-09T21:25:04+5:30
Crime News: व्यवसाय वाढवायचे आमिष दाखवून चेकद्वारे घेतलेले ५ लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Crime News: व्यापाऱ्यांची ५ लाखाची फसवणूक
- सदानंद नाईक
उल्हासनगर - व्यवसाय वाढवायचे आमिष दाखवून चेकद्वारे घेतलेले ५ लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-१ मध्ये राहणारे परमानंद हिंदुजा यांना ओळ्खीचे दिलीप दुलानी व कमलेश दुलानी यांनी विश्वासात घेऊन व्यवसाय वाढवायचा असल्याचे सांगून त्याबदल्यात मोठा परतावा देतो. असे आमिष दाखविले. हिंदुजा यांनीं २८ ऑगस्ट २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान चेकद्वारे ५ लाख रुपये दिले. तसेच विश्वास व्हावा म्हणून दुलानी यांनी ३० हजार रुपये परतावा दिला. मात्र नंतर दिलेले पैसे व परतावा देत नसल्याने, हिंदुजा यांनी दिलेल्या पैश्याची मागणी केली. तेंव्हा पैसे देत नाही, जे करायचे आहे, ते कर. अशी धमकी त्यांना दिली. अखेर हिंदुजा यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी दिलीप व कमलेश दुलानी यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.