सुभाराव खराडे व ज्योती खराडे हे बल्याणी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. या दाम्पत्याने २०१४ रोजी सावंत यांना दोन गुंठे जमीन विकली होती. परंतु या जागेव्यतिरिक्त सावंत यांनी अतिक्रमण करून अधिक खोल्यांचे बांधकाम केल्याची तक्रार करून खराडे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाकडे हे बांधकाम हटवण्याची मागणी केली हाेती. त्यानुसार पालिकेने चाळीचे बेकायदा बांधकाम हटवून जागा मोकळी करून दिली. यानंतर सावंत यांनी खराडे कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरून टिटवाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५५४, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काजोल यादव करत आहेत.
बांधकाम व्यावसायिकावर विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:27 IST