सलमान खान धमकीप्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेचं पथक आज पालघरमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 08:02 IST2022-06-13T08:02:26+5:302022-06-13T08:02:40+5:30

गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ चे एक पथक पालघरमध्ये दाखल झाले आहे.

Crime Branch team in Palghar today to probe Salman Khan threat case | सलमान खान धमकीप्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेचं पथक आज पालघरमध्ये!

सलमान खान धमकीप्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेचं पथक आज पालघरमध्ये!

मुंबई :

गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ चे एक पथक पालघरमध्ये दाखल झाले आहे. याठिकाणी सलमान खान धमकी प्रकरणातील तीन संशयितांची माहिती गोळा करण्यासाठी पोहोचले असल्याची माहिती असून या सर्व तपासाबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.

सलमानच्या घराजवळ धमकीचे पत्र ठेवणारे  तिन्ही संशयित पालघर जिल्ह्यातील वाडा परिसरात राहून तेथील एका कंपनीत काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार धमकीच्या पत्राची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी पालघर जिल्ह्यातील वाडा आणि कासा येथे आले होते. तसेच संशयितांची अधिक माहिती मिळवण्यासाठी ते काम करत असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनासोबत मुंबई गुन्हे शाखेने संपर्क साधला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुन्हे शाखेची ही एक विचारपूर्वक कारवाई होती आणि ही संवेदनशील बाब असल्याने अधिक तपशील गुप्त ठेवला जात आहे.

Web Title: Crime Branch team in Palghar today to probe Salman Khan threat case