Crime against six power thieves | वीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा

वीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा

नालासोपारा : वसई तालुक्यात कित्येक वर्षांपासून वीजचोरी करणाºया टोळ्या सक्रिय असून रात्री वीज खांबावर आकडा टाकून वीजचोरी करतात. याबाबत ‘लोकमत’ने ‘नालासोपारा शहरात सर्रास वीजचोरी’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वीजचोरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महावितरणच्या अधिकाºयांनी गावराई पाडा संतोष भवन परिसरात छापे मारून वीजचोरीचा पर्दाफाश करत सहा जणांविरु द्ध गुरु वारी तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केला आहे.

आरोपी मोहम्मद अश्रफ, मोहम्मद इर्शाद शहा, राजेश एल गुप्ता, सचिन गुप्ता, प्रभुनाथ यू. गुप्ता आणि फैजल अन्सारी या सहा जणांवर तुळिंज पोलीस ठाण्यात गुरु वारी गुन्हा दाखल केला आहे. नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन येथील गावराई पाडा या परिसरात वीजचोरी करत असताना रंगेहात पकडले असून महावितरणचे अभियंता झिशान अहमद जमाल (३३) यांनी तक्र ार नोंदवली होती.
या सहा आरोपींनी सहा महिन्यांत तब्बल दोन लाख ३३ हजार ९५० रुपयांच्या १३ हजार ५७६ युनिटची वीजचोरी केली.

टेन परिसरात २० तास बत्ती गुल
लोकमत न्यूज नेटवर्क
मनोर : मस्तान नाका येथे एका बिल्डिंगच्या समोर जेसीबी वाहनाद्वारे जमीन समतल (लेव्हल) करताना मुख्य वीज वाहिनीची केबल कट झाल्याने २० तास वीज खंडित झाल्याने टेन गाव परिसरात लोकांचे प्रचंड हाल झाले.
मस्तान नाका येथे मिराज हॉटेल बिल्डिंगसमोर जेसीबीने माती सारखी करताना जमिनीत पुरलेली केबल वायर कट झाली. यामुळे शनिवारी ५ वाजल्यापासून वीज खंडित झाली असल्याने टेन परिसरातील नागरिक २० तास विजेपासून वंचित होते. पाणी नसल्याने घरातील लहान मुले, वृद्ध तसेच महिलांचे प्रचंड हाल झाल्याने नाराजी व्यक्त होत होती.

Web Title: Crime against six power thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.