विनापरवाना मद्य वाहतुकीप्रकरणी चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 20:39 IST2018-01-21T20:39:02+5:302018-01-21T20:39:14+5:30
मद्याची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी भार्इंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात दाखल दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात चौघांना अटक केली आहे.

विनापरवाना मद्य वाहतुकीप्रकरणी चौघांवर गुन्हा
मीरा रोड - मद्याची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी भार्इंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात दाखल दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात चौघांना अटक केली आहे. तर मद्य व टेम्पो मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
मद्याची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची माहिती विभागीय पोलीस उपअधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्यानंतर त्यांनी नवघर पोलिसांना सोबत घेऊन सापळा रचला.
गोल्डन नेस्टकडून इंद्रलोक कडे जाणारे दोन छोटे टेम्पो पकडून त्यात तपासणी केली असता विदेशी मद्याच्या बाटल्या आदी मद्यसाठा आढळून आला. सदर मद्याची वाहतूक करण्याचा परवाना सबंधितांकडे नसल्याने पोलिसांनी दोन्ही टेम्पोचे चालक व वाहक असे मिळून चौघांना अटक केली आहे. दोन्ही टेम्पोचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे उपनिरीक्षक महेश कुचेकर म्हणाले.