उल्हासनगरात निवडणुकीच्या कामात कामचुकार करणाऱ्या ४ शिक्षकांवर गुन्हा, शिक्षकांत असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 18:30 IST2026-04-04T18:30:13+5:302026-04-04T18:30:42+5:30

राज्य शासनाच्या आदेशानव्ये बीएलओ पदी नियुक्त केलेल्या ४ शिक्षकांवर कामात कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेवून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Crime against 4 teachers for evading election work in Ulhasnagar, dissatisfaction among teachers | उल्हासनगरात निवडणुकीच्या कामात कामचुकार करणाऱ्या ४ शिक्षकांवर गुन्हा, शिक्षकांत असंतोष

उल्हासनगरात निवडणुकीच्या कामात कामचुकार करणाऱ्या ४ शिक्षकांवर गुन्हा, शिक्षकांत असंतोष

उल्हासनगर : निवडणूक मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानव्ये बीएलओ पदी नियुक्त केलेल्या ४ शिक्षकांवर कामात कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेवून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ऐन शाळा मुलांच्या परीक्षेवेळी निवडणूक मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी काही शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्त केल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व उल्हासनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सहायक मतदार नोदणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विशाल वसंत कदम व गणेश शिंपी यांच्याकडे मतदान केंद्रस्तरीय अधिका-याची नियुक्ती करण्याचे निर्देष दिले आहेत. त्यानुसार शहरातील अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची बीएलओ म्हणून नेमणुका केल्या आहेत. नियुक्त केलेले बीएलओ शहरातील निवडणुक मतदार याद्या एसआयआर मॅपिंग करणे व अस्पष्ट छायाचित्राची पडताळणी करून स्पष्ट छायाचित्र प्राप्त करणे, बार मतदारांची वगळणी करणे इत्यादी कामाची जबाबदारी सोपण्यात आली.

निवडणूक याद्या व त्या सबंधित काम करताना संतोष सिताराम गोरडे, मोनिका गिरीश नारंग, महेश जनार्दन बडेकर व अनिल शांताराम पाटील या शिक्षकांनी कामामध्ये कसुर व हलगर्जीपणा केल्याचा ठपका विशाल कदम व गणेश शिंपी यांनी ठेवला आहे. विशाल कदम यांच्या तक्रारीनुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या चार शिक्षकां विरोधात तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकाराने शिक्षका मध्ये असंतोष व नाराजी निर्माण झाली आहे.

Web Title : उल्हासनगर: चुनाव ड्यूटी में लापरवाही करने पर 4 शिक्षकों पर मामला दर्ज, असंतोष

Web Summary : उल्हासनगर में मतदाता सूची अपडेट के दौरान बीएलओ के रूप में कर्तव्य में लापरवाही के लिए चार शिक्षकों पर आरोप लगे हैं। स्कूल परीक्षाओं के साथ हुई इस कार्रवाई ने उन शिक्षकों में असंतोष पैदा कर दिया है जिन्हें शिक्षण कर्तव्यों के साथ चुनावी जिम्मेदारियां सौंपी गई थीं।

Web Title : Ulhasnagar: 4 Teachers Booked for Neglecting Election Duty, Discontent Rises

Web Summary : Four teachers in Ulhasnagar face charges for dereliction of duty as BLOs during voter list updates. This action, coinciding with school exams, has sparked discontent among teachers who were assigned election responsibilities alongside their regular teaching duties.