शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचामृत मोदका’ची क्रेझ

By admin | Updated: September 4, 2016 03:10 IST

गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य अशी ओळख असलेल्या मोदकाच्या खरेदीसाठी ठाण्याच्या बाजारपेठेत प्रचंड झुंबड उडाली आहे. यंदा स्पेशल फ्लेवर्सचे मोदक बाजारात नव्याने पाहायला मिळत

ठाणे : गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य अशी ओळख असलेल्या मोदकाच्या खरेदीसाठी ठाण्याच्या बाजारपेठेत प्रचंड झुंबड उडाली आहे. यंदा स्पेशल फ्लेवर्सचे मोदक बाजारात नव्याने पाहायला मिळत असून त्यापैकी ‘पंचामृत मोदक’ खास आकर्षण ठरले आहे.मोदक खरेदी करायला येणारे ग्राहक पंचामृत मोदकांनाच पसंती देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.नेहमीच्या मावा, मलई मोदकांपेक्षा आंबा मोदक जास्त हिट ठरले आहे. अवघ्या एक दिवसावर बाप्पाचे आगमन येऊन ठेपले आहे. यानिमित्त केल्या जाणाऱ्या खरेदीची लगीनघाई सुरू आहे. मखर, पूजेचे साहित्य, हारफुले, सजावटीचे साहित्य अशा खरेदीबरोबर महत्त्वाची खरेदी असते, ती मोदकांची. बाजारपेठेत भक्तांच्या खरेदीला उत्साह आला आहे. गर्दीची झुंबड उडाली आहे. मिठाईच्या दुकानांत तर भक्तांची रीघ लागली आहे. एरव्ही, पाच मिनिटांत होणाऱ्या या खरेदीला अर्धा-पाऊणतास भक्तांना थांबावे लागत आहे. मावा मोदकामध्ये खस, थंडाई, लिची-कोकोनट, जायफळ, कंदी, आंबा मावा हे मोदक असून ५०० ते ६०० रुपये किलोंना मिळत आहेत. मलई मोदकांमध्ये आंबा, पिस्ता, स्ट्रॉबेरी, अंजीर, रोझ हे मोदक असून ६४० ते ६८० रुपये किलो दराने मिळत आहेत. काजू मोदकामध्ये प्लेन काजू, केशर, ड्रायफ्रूट, अंजीर हे मोदक असून ते ८०० ते १००० रुपये किलो दराने मिळत आहेत. स्पेशल फ्लेवर्समध्ये चंदन, केवडा, केशर, गुलाब, खस या पाच फ्लेवर्सचा मिळून असलेला ‘पंचामृत मोदक’ यंदा नवीनच पाहायला मिळत आहे. काजू, गुलाब, गुलकंद यांचा एकत्र फ्लेवर्स असलेला मोदक, मलई कुल्फी मोदक, बटरस्कॉच, रिअल रोझ पत्ती मोदक हे नवीन प्रकार मोदकांमध्ये पाहायला मिळत आहेत. ६०० ते ७०० रुपये किलोने हे मोदक मिळत आहे. ज्यांना दरवर्षी मोदकांमधील नावीन्य शोधण्याची इच्छा असते, ते ग्राहक स्पेशल फ्लेवर्सकडे वळतात, असे केदार जोशी यांनी सांगितले. गतवर्षीपेक्षा यंदा (पान ३ वर)